"ड्रामा झाला आणि तीन वेळा लग्न झालं!", शाल्व किंजवडेकरने 'शिवा' मालिकेला दिला निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 13:39 IST2025-08-09T13:38:53+5:302025-08-09T13:39:12+5:30
Shiva Serial : शाल्व किंजवडेकरने इंस्टाग्रामवर 'शिवा' मालिका आणि सेटवरील काही क्षणांचा व्हिडीओ शेअर करत मालिकेला निरोप दिला आहे.

"ड्रामा झाला आणि तीन वेळा लग्न झालं!", शाल्व किंजवडेकरने 'शिवा' मालिकेला दिला निरोप
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' (Shiva Serial) मालिकेने नुकतेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले होते. शिवाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. शिवाची भूमिका पूर्वा कौशिक(Purva Kaushik)ने साकारली होती. तर अभिनेता शाल्व किंजवडेकर(Shalva Kinjawdekar)ने आशुतोषची भूमिका साकारली होती. शाल्वने नुकतेच मालिकेतील काही क्षणांचे व्हि़डीओ शेअर करत मालिकेला निरोप दिला आहे.
शाल्व किंजवडेकरने इंस्टाग्रामवर 'शिवा' मालिका आणि सेटवरील काही क्षणांचा व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले की, मारमारी झाली, दुष्टांचा खेळ खलास केला, ड्रामा झाला, आणि तीन वेळा लग्न झालं! दीड वर्ष नुसता शिवा चा छकुला बनून इकडे तिकडे फिरत तिची साथ देत देत कधी मालिकेचा निरोप घ्यायची वेळ आली कलळच नाही! आता हा मालिकेचा हैंगओवर बराच वेळ टिकणार आहे हे नक्की. या प्रवासात खूप काही शिकलो, नवीन मित्र बनवले . तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम सोबत राहिले.
त्याने पुढे लिहिले की, मालिकेमध्ये हीरो नसून हिरोईन च्या भूमिकेत काम करायचा हा पहिलाच अनुभव. जोक्स अपार्ट, मालिकेमध्ये आमची शिवाच हीरो होती आणि हीरोईन सुद्धा तीच होती. तिचा प्रवास बघताना आणि त्याचा भाग बनून तिला सपोर्ट करताना खूप मजा आली . झी मराठीवरील सर्व मालिका, एका पारंपारिक हीरोइन ची चौकट मोडून एक वेगळा प्रयोग सादर करत आहेत, आणि अशा मालिकेत काम करायची संधी मिळाली, खूप लकी आहे मी!
आता आशुतोष छकुला देसाई म्हणून निरोप घेतो.. भेटतच राहूया नवीन काहीतरी घेऊन येतो, तोवर बाय बाय.