Then & Now किती बदलली टीव्हीची नागिण,आता गाजवणार बॉलिवूड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 16:16 IST2018-01-10T10:46:58+5:302018-01-10T16:16:58+5:30
छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरलेला नागिण लवकरच मोठ्या पडद्यावर रसिकांच मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच गोल्ड सिनेमातून अक्षयकुमारसह रूपेरी ...
.jpg)
Then & Now किती बदलली टीव्हीची नागिण,आता गाजवणार बॉलिवूड!
छ ट्या पडद्यावर सुपरहिट ठरलेला नागिण लवकरच मोठ्या पडद्यावर रसिकांच मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच गोल्ड सिनेमातून अक्षयकुमारसह रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. मौनी आता तिच्या एका ग्लॅमरस फोटोशूटमुळेही चर्चेत आहे. तिने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. या फोटोत मौनी रॉय व्हाइट कलरच्या शर्टमध्ये टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसली होती.त्यासोबत या लूकला आणखी स्टायलिश करण्यासाठी मौनीने स्टॉकिंग्स कॅरी केले,त्यामुळे ती अधिकच ग्लॅमरस दिसते.खुद्द मौनीनेच तिचे हे काही निवडक फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.मौनीने केलेले हे फोटोशूट पहिल्यांदाच केले आहे असे नसून आधीही तिने अशाप्रकारेच ग्लॅमरस फोटोशूट केले होते.मौनीने काही महिन्यांपूर्वी ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप परिधान करत हटके फोटोशूट केले होते. त्या फोटोशूटमधील अंदाजही तिच्या चाहत्यांना खूप आवडला होता. तर दुसऱ्या फोटोत मौनीने ब्लॅक डीप नेकचा टॉप आणि लाईन्स वाली पँट घातत हटके पोज देत फोटोशूट करून घेतले होते. चाहत्यांनी दिलेल्या कमेंटस आणि लाईक्समुळेच क्रॉप टॉप फोटोशूटला अवघ्या दोनच दिवसात 25 लाख 9 हजार 517 लोकांनी लाईक्स केले होते. तर दुसऱ्या फोटोला 22 तासांच्या आत 21 लाख 3 हजार 228 लोकांनी बघून लाईक केल्याचे पाहायला मिळाले होते.
एकता कपूरचा अपकमिंग टीव्ही शो 'नागिन 3' चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. नव्या शोचा टीझर पाहून नागिनच्या पहिल्या 2 सीजनमध्ये लीड अॅक्ट्रेस राहिलेली मौनी रॉय इमोशनल झाली आहे. मौनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नागिनचा एक व्हिडिओ पोस्ट करुन म्हटले आहे, 'हा शो माझ्या अतिशय जवळचा आहे. या शोने मला ओळख मिळवून दिली आहे. एकता मॅमची मी सदैव ऋणी राहील.' मौनी रॉयच्या या पोस्टवर एकताने लिहिले आहे, 'शूटिंगवेळी आम्हाला तुझी आवठण येत होती.आयुष्यातील मोठ्या संधी तुझी वाट पाहात आहेत.' मौनीने 2007 मध्ये 'क्योंकी सास भी कभी बहू थी' पासून अॅक्टिंग करिअरला सुरुवात केली होती.आता मौनीच्या लूकमध्ये खूप बदल झाला आहे.