'द कपिल शर्मा' शो घेणार प्रेक्षकांचा निरोप, या दिवशी प्रसारीत होणार शेवटचा एपिसोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 18:07 IST2023-06-23T18:06:49+5:302023-06-23T18:07:14+5:30

The Kapil Sharma Show : कॉमेडियन कपिल शर्माचा शो लवकरच संपणार आहे. टीमने शेवटचा एपिसोड शूट केला. यावेळी संपूर्ण टीम भावूक झाली होती.

'The Kapil Sharma' show will bid farewell to the audience, the last episode will be aired on this day | 'द कपिल शर्मा' शो घेणार प्रेक्षकांचा निरोप, या दिवशी प्रसारीत होणार शेवटचा एपिसोड

'द कपिल शर्मा' शो घेणार प्रेक्षकांचा निरोप, या दिवशी प्रसारीत होणार शेवटचा एपिसोड

छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो 'द कपिल शर्मा'(The Kapil Sharma Show)च्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. कॉमेडियन कपिल शर्माचा शो लवकरच संपणार आहे. टीमने शेवटचा एपिसोड शूट केला. यावेळी संपूर्ण टीम भावूक झाली होती. सुमोना चक्रवर्ती ते किकू शारदा यांच्यासह सर्व टीम मेंबर्सचे फोटो समोर आले आहेत. आणि आता टीम USA मध्ये लाइव्ह शोसाठी रवाना होणार आहे. 

सुमोना चक्रवर्तीने शूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. द कपिल शर्मा शोचा हा सीझन आता संपणार असल्याची पुष्टी त्यांनी केली. त्यांनी शेवटच्या एपिसोडचे शूटिंग पूर्ण केले आहे. या फोटोंमध्ये सुमोनासोबत संपूर्ण टीमही दिसत आहे. सुमोना चक्रवर्तीशिवाय किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर आणि टीमचे इतर सदस्य दिसत आहेत. त्याचवेळी किकू शारदानेही टीमसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. जिथे संपूर्ण टीम खूप मस्ती करताना दिसत आहे.

कपिल शर्माला अर्चना पूरण सिंगची भासणार उणीव 
एक दिवसापूर्वी कपिल शर्मानेही अर्चना पूरण सिंगसोबत पोस्ट शेअर केली होती. तो म्हणाला होता की, तो शोच्या जजला खूप मिस करत आहे. कपिलने लिहिले की, 'हे या सीझनचे शेवटचे फोटोशूट आहे. अर्चना जी आमच्या शोची राणी आहे. मी तिला युएसएमध्ये खूप मिस करणार आहे. तुझ्यावर खूप प्रेम आहे.

कपिल शर्मा शो चा शेवटचा एपिसोड कधी येणार?
'द कपिल शर्मा'चा शेवटचा एपिसोड जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रसारित होणार आहे. यानंतर शिल्पा शेट्टी, किरण खेर आणि बादशाह यांचा रिएलिटी शो प्रसारीत होणार आहे. जो अर्जुन बिजलानी होस्ट करणार आहे. 

Web Title: 'The Kapil Sharma' show will bid farewell to the audience, the last episode will be aired on this day