'या' 5 स्पर्धकांवर ‘बिग बॉस’च्या घरातून ‘बेघर’ होण्याची टांगती तलवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 19:37 IST2023-10-31T19:21:33+5:302023-10-31T19:37:13+5:30
आता यंदाच्या आठवड्यातही पाच स्पर्धकांवर ‘बिग बॉस’च्या घरातून ‘बेघर’ होण्याची टांगती तलवार लटकलेली आहे.

'या' 5 स्पर्धकांवर ‘बिग बॉस’च्या घरातून ‘बेघर’ होण्याची टांगती तलवार
'बिग बॉस 17' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोमध्ये कधी काय होइल सांगता येत नाही. कधी कुणाचा शो मधील हा शेवटचा आठवडा असू शकतो, हे सांगणे ही तितकेच अवघड आहे. आता या आठवड्यातही पाच स्पर्धकांवर ‘बिग बॉस’च्या घरातून ‘बेघर’ होण्याची टांगती तलवार लटकलेली आहे.
बिग बॉस 17 च्या एका फॅन पेजने नॉमिनेशन अपडेट शेअर केले आहे. बिग बॉस 17 च्या तिसऱ्या आठवड्यात 5 स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आले आहे. या आठवड्यात अरुण महाशेट्टी, समर्थ जुरेल, ईशा मालवीय, सना रईस खान आणि मनस्वी ममगाई यांना नॉमिनेट करण्यात आले आहे. तथापि, निर्मात्यांनी अद्याप नामांकनाबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.
समर्थ जुरेल आणि मनस्वी ममगाई हे नुकतेच वाईल्ड कार्ड एंट्री घेत घरात दाखल झाले आहेत. बिग बॉस 17 च्या आगामी 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान या पाच नामांकित स्पर्धकांपैकी कोणत्याही एकाला शोमधून कायमचे काढून टाकेल.
बिग बॉस या खेळात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आपण या घरात शेवटपर्यंत टिकून राहावं असं वाटतं. पण ते शक्य नसतं. कोणा एका सदस्याला घराबाहेर पडणे अनिवार्य असतं. नुकतेच 'बिग बॉस'च्या 17 व्या पर्वातलं पहिलं एलिमिनेशन पार पडलं आणि अभिनेत्री सोनिया बन्सलला घराबाहेर जावं लागलं. आता या एलिमिनेशमध्ये कोण तग धरून राहतात, कोण घराबाहेर पडतात, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.