'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन'चा रंगणार महाअंतिम सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 16:17 IST2024-07-06T16:16:46+5:302024-07-06T16:17:11+5:30

Mi Honar Superstar Jodi Number One :'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन' कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. आता हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

The grand finale ceremony of 'Mi Honar Superstar Jodi Number One' will be held | 'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन'चा रंगणार महाअंतिम सोहळा

'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन'चा रंगणार महाअंतिम सोहळा

मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालेला हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ६ आणि ७ जुलैला या लोकप्रिय कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पाहायला येणार आहे, पलख-पूर्वा, आकाश-सुरज, सिद्धेश-रुचिता आणि अपेक्षा-प्रतिक्षा या चार जोड्यांमध्ये महाअंतिम सामना रंगणार आहे. महाअंतिम सोहळ्यात या अंतिम ४ जोड्यांना प्रवाह परिवारातल्या ४ कलाकारांची साथ मिळणार आहे. 

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी, लग्नाची बेडीमधील राघव, येड लागलं प्रेमाचं मालिकेतील मंजिरी आणि आई कुठे काय करते मालिकेतील संजना महाअंतिम सोहळ्यात स्पर्धकांसोबत ताल धरणार आहेत. यासोबतच सुपरजज अंकुश चौधरी आणि समृद्धी केळकर, कॅप्टन फुलवा खामकर आणि वैभव घुगे यांचे धमाकेदार परफॉर्मन्सेसही पाहायला मिळणार आहेत. 

पलख-पूर्वा, आकाश-सुरज, सिद्धेश-रुचिता आणि अपेक्षा-प्रतिक्षा या चार जोड्यांमधून अंतिम विजेता कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या टॉप ४ जोड्यांचा नेत्रदीपक नृत्याविष्कार अनुभवायचा असेल तर पहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा ६ आणि ७ जूनला रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Web Title: The grand finale ceremony of 'Mi Honar Superstar Jodi Number One' will be held