'शिवा' मालिकेत या प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीची एन्ट्री, साकारणार आशूच्या आईची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 14:25 IST2024-02-09T14:25:02+5:302024-02-09T14:25:44+5:30

Shiva Serial : झी मराठी वाहिनीवर लवकरच शिवा मालिका भेटीला येत आहे. ही मालिका १२ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

The famous actor's daughter's entry in the serial 'Shiva' will play the role of Ashu's mother | 'शिवा' मालिकेत या प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीची एन्ट्री, साकारणार आशूच्या आईची भूमिका

'शिवा' मालिकेत या प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीची एन्ट्री, साकारणार आशूच्या आईची भूमिका

झी मराठी वाहिनीवर लवकरच शिवा मालिका (Shiva Serial) भेटीला येत आहे. ही मालिका १२ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेनंतर अभिनेता शाल्व किंजवडेकर पुन्हा एकदा झी मराठीवर झळकणार आहे. अभिनेत्री पूर्वा फडकेला त्याची नायिका बनण्याची संधी मिळाली आहे. तिखट स्वभावाची शिवा आणि गोड स्वभावाचा आशु यांची ही कहाणी मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत शिवाच्या आईची भूमिका अभिनेत्री मीरा वेलणकरने साकारली आहे.

शिवा मालिकेत सिताई ही भूमिका अभिनेत्री मीरा वेलणकर साकारत आहे. मीरा वेलणकर या दिग्दर्शिका तसेच निर्मात्या देखील आहेत. बटरफ्लाय या चित्रपटाचे दिग्दर्शन तिने केले. तसेच याअगोदर स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या तू तेव्हा तशी या मालिकेत मीराने एक छोटीशी भूमिका साकारली होती. 

मीरा वेलणकर प्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर आणि रजनी वेलणकर यांची मुलगी आहे. मधुरा, मीरा आणि गौरी अशी तीन अपत्ये त्यांना आहेत. मधुरा वेलणकर ही मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती आजही कलाविश्वात सक्रीय आहे. आई रजनी वेलणकर यांनी झी मराठीच्याच सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत आजीची भूमिका साकारली होती.

काही दिवसांपूर्वीच या मालिकेतून त्यांच्या पात्राची एक्झिट करण्यात आली होती. त्यामुळे आई झी मराठीवर बाजूला होताच मुलीची एन्ट्री झाली अशी चर्चा शिवा मालिकेमुळे होत आहे. मीरा वेलणकर यांनी बऱ्याच प्रतीक्षेनंतर झी मराठी वाहिनीवर कमबॅक केले आहे. तू तेव्हा तशी या मालिकेत मीरा वेलणकर यांनी नायिकेच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. 

Web Title: The famous actor's daughter's entry in the serial 'Shiva' will play the role of Ashu's mother