'एक नंबर तुझी कंबर' गाण्याची भुरळ, प्रेग्नेंट गौहर खानने शेअर केला डान्सचा रिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 18:00 IST2025-06-04T18:00:26+5:302025-06-04T18:00:48+5:30

'गुलाबी साडी' नंतर संजू राठोड 'एक नंबर तुझी कंबर' (Ek Number Tuzi Kambar Song) गाणं घेऊन आला आहे. त्याचे हे गाणंदेखील सध्या तुफान गाजतंय.

The allure of the song 'Ek Number Tuji Kambar', pregnant Gauhar Khan shares a dance reel | 'एक नंबर तुझी कंबर' गाण्याची भुरळ, प्रेग्नेंट गौहर खानने शेअर केला डान्सचा रिल

'एक नंबर तुझी कंबर' गाण्याची भुरळ, प्रेग्नेंट गौहर खानने शेअर केला डान्सचा रिल

'गुलाबी साडी' नंतर संजू राठोड 'एक नंबर तुझी कंबर' (Ek Number Tuzi Kambar Song) गाणं घेऊन आला आहे. त्याचे हे गाणंदेखील सध्या तुफान गाजतंय. गुलाबी साडी जसं अख्ख्या देशभरात हिट झालं तसंच हे गाणंही हिट होतंय. अगदी इतर भाषिकही या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या व्हायरल गाण्यावर अभिनेत्री गौहर खान(Gauhar Khan)नेही रिल केला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

संजू राठोडच्या 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या गाण्यात हिंदी बिग बॉस फेम अभिनेत्री ईशा मालवीयने डान्स केला आहे. इतरही अनेक सेलिब्रिटींनी हे गाणं रिक्रिएट केलं आहे. आता या गाण्याने टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानलाही चांगलीच भुरळ घातली आहे. तिने या गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी गौहरने फ्लोरल प्रिंट असलेला शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. ती दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, माझ्या लाडकीवर प्रेम दाखवण्यासाठी हे करावे लागले! ईशा मालवीय एक नंबर. गौहरच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 


टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस' फेम गौहर खान दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे. गौहर खानने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरुन ती प्रेग्नंट असल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. पाच वर्षांपूर्वी गौहर खानने जैद दरबारसोबत निकाह केला होता. त्यानंतर २०२३ साली तिने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. आता पुन्हा ती आई होणार आहे. दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी गौहर आणि जैद उत्सुक आहेत. 

Web Title: The allure of the song 'Ek Number Tuji Kambar', pregnant Gauhar Khan shares a dance reel