'पिंकीचा विजय असो' फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 10:28 IST2023-09-20T10:28:46+5:302023-09-20T10:28:58+5:30

अभिनेत्री शरयू सोनावणेनं सोशल मीडियावर साखरपुड्याचा फोटो शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

The actress of 'Pinkycha Vijay Aso' fame has secretly given up on Urak | 'पिंकीचा विजय असो' फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा

'पिंकीचा विजय असो' फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा

स्टार प्रवाह वाहिनीवरील पिंकीचा विजय असो मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत पिंकीची भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणे हिने साकारली होती. काही दिवसांपूर्वी तिने अचानक मालिकेला रामराम ठोकला. तिने अचानक मालिका सोडल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला. दरम्यान आता शरयूने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तिने गुपचूप साखरपुडा केला आहे.

शरयू सोनावणे हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे. आनंदी आणि एंगेज. गणपती बाप्पा मोरया. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव जयंत लाडे असून तो मराठी सिनेइंडस्ट्रीतील निर्माता आहे. त्याने ‘सूर सपाटा’ आणि ‘अ पेईंग गेस्ट’ या चित्रपटांसाठी काम केलं आहे.

शरयूच्या या पोस्टवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. चाहत्यांसोबत तिच्या या पोस्टवर कलाकारांनीदेखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पूजा पुरंदरे,  विजय आंदळकर, समृद्धी केळकर, गिरीजा प्रभू, कोमल कुंभार या कलाकारांचा समावेश आहे.

Web Title: The actress of 'Pinkycha Vijay Aso' fame has secretly given up on Urak