'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री, दिसणार वकीलाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 17:42 IST2022-03-12T17:41:47+5:302022-03-12T17:42:21+5:30

Sundara Manamadhye Bharli:'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत वकिलाच्या भूमिकेत ही प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार आहे.

The actress' entry in the series' Sundara Manamdhe Bharli 'will be seen in the role of a lawyer | 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री, दिसणार वकीलाच्या भूमिकेत

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री, दिसणार वकीलाच्या भूमिकेत

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhye Bharli) या मालिकेतून आतापर्यंत पाच कलाकारांनी वेगवेगळ्या कारणांस्तव निरोप घेतला आहे. नुकतेच या मालिकेत नवीन कामिनीची एन्ट्री झाली आहे. या भूमिकेत पूजा पुरंदरे ऐवजी अभिनेत्री श्वेता नाईक (Shweta Naik) हिची एन्ट्री झाली आहे. त्यानंतर आता या  मालिकेत नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे. मालिकेत वकिलाच्या भूमिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titiksha Tawade) दिसणार आहे. तिच्या एन्ट्रीमुळे मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.
 
सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत आक्कासाहेबांच्या मृत्यूला अभ्याला जबाबदार ठरवण्यात आले आहे आणि त्यासाठी त्याला अटक करण्यात आली आहे.अभ्याची कोर्टातली केस लढण्यासाठी एका महिला वकिलाची एन्ट्री होणार आहे. या वकिलाच्या भूमिकेत आपल्याला अभिनेत्री तितिक्षा तावडे दिसणार आहे.

तितीक्षा तावडे हिने याआधी ‘तु अशी जवळी रहा, सरस्वती अशा मालिकांमध्ये काम केली आहेत. आता ती आपल्याला ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत वकिलाच्या भूमिकेत पाहायला भेटणार आहे. याशिवाय ती शाब्बास मिथू या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. खेळाडूप्रमाणे फिट दिसण्यासाठी तिने आपल्या फिटनेसवर बरेच कष्ट घेतले आहेत. त्यामुळे सिनेमातील तितीक्षाची ही भूमिका थोडी खास असणार आहे.

अनेक कलाकारांनी मालिकेतून घेतला निरोप
सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून नुकतेच नंदिनीने देखील निरोप घेतला आहे. नंदिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आदिती द्रविडचा मालिकेतला ट्रॅक संपल्यामुळे तिने मालिकेचा निरोप घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अनेक कलाकारांनी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका सोडली आहे. अभ्याच्या वहिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रणिती नरकेने आजारपणामुळे सोडली आहे. दौलतच्या आबाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते धनंजय वाबळे यांनी देखील ही मालिका सोडली. लतिकाच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी किरणनेदेखील मालिका सोडली आहे.

Web Title: The actress' entry in the series' Sundara Manamdhe Bharli 'will be seen in the role of a lawyer