४६ वर्षीय मराठमोळ्या या अभिनेत्रीने करिअरमुळे आई न होण्याचा घेतलाय निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 16:22 IST2024-04-30T16:22:29+5:302024-04-30T16:22:49+5:30

टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री अनेकदा त्यांच्या करिअरसाठी लग्न किंवा मुले होण्यास उशीर करतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका टीव्ही अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिला लग्नाच्या ९ वर्षांनंतरही मुल नको आहे.

The 46-year-old Marathmola actress has decided not to become a mother due to her career | ४६ वर्षीय मराठमोळ्या या अभिनेत्रीने करिअरमुळे आई न होण्याचा घेतलाय निर्णय

४६ वर्षीय मराठमोळ्या या अभिनेत्रीने करिअरमुळे आई न होण्याचा घेतलाय निर्णय

टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री अनेकदा त्यांच्या करिअरसाठी लग्न किंवा मुले होण्यास उशीर करतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका टीव्ही अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिला लग्नाच्या ९ वर्षांनंतरही मुल नको आहे. ही अभिनेत्री म्हणजे नारायणी शास्त्री (Narayani Shashtri). नाना पाटेकर यांच्या 'पक पक पकाक' सिनेमात नारायणीने साळूची भूमिका साकारली होती. तिने  २०१५ साली परदेशी बॉयफ्रेंड स्टीवन ग्रेवरसोबत लग्नगाठ बांधली. हे लग्न तिने बराच काळ सीक्रेटच ठेवले होते. आता नुकतंच तिने पालक होण्याबाबत खुलासा केला.

नारायणी शास्त्री यांनी क्यूंकी सास भी कभी बहू थी, पिया का घर आणि लाल बनारसी यांसारख्या अनेक उत्तम मालिकांमध्ये काम केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की तिला आता आई बनायचे नाही आणि २०१५ मध्ये तिने तिचा बॉयफ्रेंड स्टीवन ग्रेवरसोबत लग्न केले. तिचे पती ब्रिटीश नागरिक आहेत आणि अनेक वर्षांपासून भारतात राहत आहेत.

नारायणी शास्त्रीच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. पण अद्याप त्यांना मुल बाळ नाही. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नारायणी म्हणाली की, "आम्हाला मूल नकोय हा आमचा जाणीवपूर्वक निर्णय आहे." अभिनेत्रीच्या या वक्तव्याने सगळेच हैराण झाले आहेत. यावर नारायणी शास्त्री पुढे म्हणाली की, "मुलांना जगात आणणे ही बाब नाही तर त्यांच्यासाठी गुंतवणूक करून त्यांना चांगला माणूस बनवण्याचाही मुद्दा आहे. अशा अनेक महिला आहेत ज्या कामासोबतच मुलांची काळजी घेतात. पण हे माझ्यासाठी खूप कठीण आहे आणि मला त्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही."

नारायणी शास्त्री याविषयी पुढे बोलताना म्हणाली की, "मी स्वतःशी खूप प्रामाणिक आहे. मी कोणाला काही सिद्ध करण्यासाठी काहीही करत नाही. लग्न झाल्यावर मी माझ्या पतीसोबत पालकत्वाबद्दलही बोलले. माझ्याकडे पाळीव प्राणी आहेत जे मला खूप आवडतात. मी खूप वर्कहोलिक आहे आणि या कारणामुळे हा फेज खूप एन्जॉय करत आहे. मुले खूप छान असतात पण माझा हा निर्णय आहे.

Web Title: The 46-year-old Marathmola actress has decided not to become a mother due to her career