Video : "तुझसे नाराज नही जिंदगी...", जुई गडकरीने गायलेलं गाणं ऐकून चाहतेही थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 12:08 PM2024-02-01T12:08:10+5:302024-02-01T12:09:11+5:30

'ठरलं तर मग' फेम जुईने गायलेलं गाणं ऐकलंत का? अभिनेत्रीच्या आवाजाचं तुम्हीही कराल कौतुक

tharal tr mag fame actress jui gadkari sing tuzse naraj nahi zindagi song video viral | Video : "तुझसे नाराज नही जिंदगी...", जुई गडकरीने गायलेलं गाणं ऐकून चाहतेही थक्क

Video : "तुझसे नाराज नही जिंदगी...", जुई गडकरीने गायलेलं गाणं ऐकून चाहतेही थक्क

जुई गडकरी हा टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे. 'पुढचं पाऊल' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या जुईने तिच्या अभिनयाने सर्वांचीच मनं जिंकून घेतली होती. अनेक मालिकांमध्ये काम करून अभिनयाचा ठसा उमटवलेल्या जुईला 'पुढचं पाऊल' मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. जुई सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

नवीन प्रोजेक्टबरोबरच जुई तिच्या वैयक्तिक आयुष्यातीलही अनेक अपडेट्स चाहत्यांना देत असते. अभिनेत्री असण्याबरोबर जुईचा गळाही एकदम गोड आहे. जुईने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती "तुझसे नाराज नही जिंदगी..." हे गाणं गाताना दिसत आहे. जुईच्या सुमधूर आवाजातील हे गाणं ऐकून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत जुईचं कौतुक केलं आहे. 

सध्या जुई स्टार प्रवाहवारील 'ठरलं तर मग' या मालिकेत सायलीची भूमिका साकारत आहे. याआधी जुई 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'सरस्वती' या मालिकांमध्ये दिसली होती. 'बिग बॉस मराठी'मध्येही ती सहभागी झाली होती. 

Web Title: tharal tr mag fame actress jui gadkari sing tuzse naraj nahi zindagi song video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.