सिंगल की रिलेशनशिपमध्ये आहे 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरी ? अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 10:42 AM2024-04-19T10:42:08+5:302024-04-19T10:44:07+5:30

अभिनयाबरोबरच जुई तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

'Tharal To Mag' fame Jui Gadkari Is In Relationship In Real Life Know The Truth | सिंगल की रिलेशनशिपमध्ये आहे 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरी ? अभिनेत्री म्हणाली...

सिंगल की रिलेशनशिपमध्ये आहे 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरी ? अभिनेत्री म्हणाली...

'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) या छोट्या पडद्यावरील सुपरहिट मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) घराघरांत पोहोचत आहे. स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतदेखील पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेत तिने साकारलेल्या सायलीच्या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.  अभिनयाबरोबरच जुई तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिच्या लग्नाची चर्चाही अनेकदा रंगताना दिसते. यातच जुईनं ती सिंगल की रिलेशनशीपमध्ये आहे, याचा खुलासा केला. 

अलिकडेच जुईने इन्स्टाग्रामवर 'Ask me a  Question' हे सेशन ठेवलं होतं. यावेळी चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने तिला ' तू सिंगल आहेस की तुझं अफेअर चालू आहे?' असा प्रश्न केला. यावेळी तिनं या प्रश्नाला दिलेल्या उत्तराने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतलं. प्रश्नावर व्हिडीओ पोस्ट करत ती म्हणाली, 'माझं अफेअर वगरे काहीही सुरू नाहीये'. 

यासोबतच एका चाहत्यानं तिला, 'तू तुझ्या आयुष्यात एवढी पॉझिटिव्ह कशी राहते?' असा प्रश्न केला. यावर उत्तर देताना जुई म्हणाली, 'काही मॅनेज वगरे करत नाही. माझ्या आयुष्यात देखील अशी नकारात्मकता येत असते. पण मी एक ठरवलेलं आहे की चॉइस आपली असते आणि मी सकारात्मकता निवडते. आपल्या मनामध्ये वाईट विचार आले की आपण आणखी विचार करत जातो. मी ते नाही करत. त्यांना टिकू देत नाही. आपण चांगलाच विचार करायचाय हे मी स्वतःला सांगितलं आहे'. 

 जुई ही पुढचं पाऊल या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. पुढचं पाऊल मालिकेत जुईनं साकारलेली कल्याणी प्रेक्षकांना आवडली. आजही या पात्राची प्रेक्षक आठवण काढत असतात. पुढचं पाऊल नंतर सरस्वती, वर्तुळ, बिग बॉस मराठी आणि आता ठरलं तर मग या मालिकेतून जुई गडकरी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. कर्जतच्या या लेकीने कलाविश्वात तिचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. जुई सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Web Title: 'Tharal To Mag' fame Jui Gadkari Is In Relationship In Real Life Know The Truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.