टीआरपीच्या शर्यतीत कोणती मालिका ठरली नंबर 1 ? तुमची आवडती मालिका कोणत्या स्थानावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 04:21 PM2022-03-17T16:21:40+5:302022-03-17T16:25:37+5:30

Marathi TV Serials TRP Ratings : या आठवड्याच्या TRP रेसमध्ये या मालिकेने मारली बाजी; या आहेत TOP 5 मालिका

television marathi serials this week trp chart aai kuthe kay karte on 2 rank | टीआरपीच्या शर्यतीत कोणती मालिका ठरली नंबर 1 ? तुमची आवडती मालिका कोणत्या स्थानावर?

टीआरपीच्या शर्यतीत कोणती मालिका ठरली नंबर 1 ? तुमची आवडती मालिका कोणत्या स्थानावर?

googlenewsNext

Marathi TV Serials TRP Ratings : नंबर वन मालिका बनण्यासाठी मालिकांमध्ये चढाओढ सुरू असते. टीआरपीच्या शर्यतीत  अव्वल राहायचं तर मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट आणले जातात. काही फसतात तर काही ट्विस्ट प्रेक्षकांना मनापासून आवडतात. सध्या अनेक मराठी मालिका चर्चेत आहेत. यापैकी कोणती मालिका नंबर 1 वर आहे, टीआरपीच्या शर्यतीत कोणत्या मालिकांनी बाजी मारलीये, हे जाणून घेण्यास उत्सुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

या आठवड्याच्या टीआरपी चार्टनुसार, ‘स्वाभिमान-शोध अस्तिवाचा’ ही स्टार प्रवाहवरची मालिका क्रमांक 10वर आहे. ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका 9व्या क्रमांकावर आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही श्रेयस आणि प्रार्थनाची मालिका आठव्या क्रमांकावर आहे. या आठवड्यात सातव्या क्रमांकावरही ‘सहकुटुंब सहपरिवार’ हीच मालिका आहे. कारण मालिकेच्या महाएपिसोडला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेने सहावा क्रमांक पटकावला आहे.

टॉप 5 मालिका
‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेला मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात  चांगले रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे ही मालिका पुन्हा  पाचव्या क्रमांकावर आली आहे. ‘ फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका टीआरपी शर्यतीत चौथ्या क्रमांकावर आहे. ‘ सुख म्हणजे नक्की काय असतं’  या मालिकेचा टीआरपी सध्या वाढला आहे. ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.

‘आई कुठे काय करते’ ही मालिका पहिल्या क्रमांकावरून घसरून दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. ‘ रंग माझा वेगळा’ मालिकेने 6.7 टीआरपी मिळवत टीआरपी चार्टवर पहिला नंबर पटकावला आहे.  

Web Title: television marathi serials this week trp chart aai kuthe kay karte on 2 rank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.