अर्ध्यावरती डाव मोडला! टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय नायिका लग्नाच्या ९ वर्षानंतर पतीपासून होणार विभक्त, घटस्फोटाबद्दल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 11:37 IST2025-11-21T11:34:25+5:302025-11-21T11:37:25+5:30
हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडपं घेणार घटस्फोट? अभिनेत्री प्रतिक्रिया देत म्हणाली...

अर्ध्यावरती डाव मोडला! टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय नायिका लग्नाच्या ९ वर्षानंतर पतीपासून होणार विभक्त, घटस्फोटाबद्दल म्हणाली...
Tv Actress Hunar Hali: 'थपकी प्यार की', 'कहानी घर घर की' अशा लोकप्रिय मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवणारी अभिनेत्री म्हणजे हुनर हाली. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही नायिका मागील काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा भाग बनली आहे.हुनर तिचा पती अभिनेता मयंक गांधीपासून घटस्फोट घेत आहे. लग्नाच्या ९ वर्षानंतर या कपलने एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने स्वत याबद्दल माहिती दिली आहे.
हुनर हाली आणि मयंक गांधी गेली ९ वर्ष एकत्र राहत होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांच्यामध्ये खटके उडत असल्याने नात्यात दुरावा निर्माण झाला.त्यामुळे दोघांनीही आपले वेगवेगळे मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला. अलिकडेच अभिनेत्रीने टेली रिपोर्टर सोबत संवाद साधला. त्या दरम्यान तिने घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल भाष्य केलं. ती म्हणाली, प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. पण, मी आयुष्य माझ्या पद्धतीने जगणं सोडलं नाही. मला वाटतं की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा लागला तरी तु्म्ही मनाशी ठाम राहिलं पाहिजे. आयुष्यात असे प्रसंग येतच राहतात. मी माझ्या माणसांचा आणि प्रेक्षकांचा विचार करते.
त्यानंतर मग हुनर म्हणाली, "माझ्या बऱ्याच लोकांसोबत कामाच्या निमित्ताने भेटीगाठी होतात. या कामाच्या माध्यमातून मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. तुमच्या आयुष्यात असे अनेक जेव्हा तुम्हाला आत्मपरिक्षण करणं गरजेचं असतं. तरच तुम्ही इतरांनाही मार्ग दाखवू शकता. "या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने त्यांच्या घटस्फोटाची प्रोसेस सुरु असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, हुनर हाली आणि तिचा पती मयंक गांधी यांनी २०१६ मध्ये लग्न केलं होतं. दिल्लीमध्ये मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. मात्र, अलिकडेच त्यांच्या घटस्फोटाचं वृत्त समोर आलं आणि चाहत्यांना धक्का बसला.