"आम्ही गेल्या १४ वर्षांपासून...", 'बिग बॉस' फेम पायल रोहतगीसोबत घटस्फोटाच्या अफवांवर पतीची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 14:26 IST2025-07-10T14:19:00+5:302025-07-10T14:26:26+5:30

'बिग बॉस' फेम पायल रोहतगीसोबत घटस्फोटाच्या अफवांवर पतीची प्रतिक्रिया, ट्रोल करणाऱ्यांना म्हणाला...

television actress bigg boss fame payal rohatgi husband sangram singh reaction on divorce rumors says  | "आम्ही गेल्या १४ वर्षांपासून...", 'बिग बॉस' फेम पायल रोहतगीसोबत घटस्फोटाच्या अफवांवर पतीची प्रतिक्रिया 

"आम्ही गेल्या १४ वर्षांपासून...", 'बिग बॉस' फेम पायल रोहतगीसोबत घटस्फोटाच्या अफवांवर पतीची प्रतिक्रिया 

Sangram Singh on Divorce Rumors :  मनोरंजनविश्वातील कलाकारांचे घटस्फोट, लग्न मोडणं ही यांसारखी प्रकरणं बऱ्याचदा कानावर येतात. त्यातच गेल्या काही दिवसांपासून टीव्ही इंडस्ट्रीतील एका लोकप्रिय जोडप्याच्या वेगळं होत असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या. हे जोडपं म्हणजे पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह. अभिनेत्री पायल रोहतगीची एक पोस्ट आणि पतीच्या कंपनीतील नोकरीला रामराम केल्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. या प्रकरणी आता तिचा पती कुस्तीपटू संग्राम सिंहने मौन सोडलं आहे.  शिवाय अफवा पसरवणाऱ्यांना धारेवर धरलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये पायल रोहतगी आणि संग्राम सिंगच्या लग्नानंतर ३ वर्षांतच एकमेकांपासून विभक्त होणार असल्याच्या अफवांवर मौन सोडतं. टाईम्स ऑप इंडियाच्या रिपोर्टनुसार, संग्राम सिंग संवाद साधत डिव्होर्सच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यावेळी तो म्हणाला, "आमच्या नात्यात घटस्फोटाचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही १४ वर्षांपासून एकत्र आहोत आणि एकमेकांचा आदर करतो. असे खोटे दावे करणं पूर्णपणे चूक आहे. मी सध्या माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो आहे. त्याचबरोबर माझी सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी अशा अफवांकडे दूर्लक्ष करावं." 

नेमकं प्रकरण काय?

अलिकडचे पायल रोहतगीने एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर करत पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये तिने म्हटलं होतं की, "मी काही वैयक्तिक कारणांमुळे संग्राम सिंग चॅरिटेबल फाऊंडेशनच्या संचालकपदाचा राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकारावा अशी मी विनंती करते. तुम्ही दिलेल्या या संधीबद्दल मनस्वी आभारी आहे", असं तिने म्हटलं आहे. "कधीकधी शांतता दूर असल्यासारखी भासते", असं कॅप्शन तिने दिलं आहे. पायलच्या निर्णयामुळे संग्राम आणि तिच्यामध्ये काही बिनसलंय का असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यावर आता संग्राम सिंहने भाष्य केलं आहे.

पायल रोहतगीबद्दल जाणून घ्या...

पायल रोहतगी हा हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. बिग बॉस-२ च्या पर्वातून ती चांगलीच लाईमलाईटमध्ये आली. या शिवाय पायल कंगना राणौतचा रिअॅलिटी शो 'लॉकअप'मध्येही ती झळकली. 

Web Title: television actress bigg boss fame payal rohatgi husband sangram singh reaction on divorce rumors says 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.