"देवाच्या आशीर्वादाने...", टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्याने मुंबईत खरेदी केलं ड्रीम होम! म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 10:53 IST2025-10-16T10:43:08+5:302025-10-16T10:53:22+5:30
"सपनों का घर...", टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्याने मुंबईत खरेदी केलं हक्काचं घर, शेअर केले गृहप्रवेशाचे खास क्षण

"देवाच्या आशीर्वादाने...", टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्याने मुंबईत खरेदी केलं ड्रीम होम! म्हणाला...
Abhishek Kumar: मायनगरी मुंबईत स्वत: चं एक हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. अलिकडच्या काळात बॉलिवूडसह टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी नवीन घरं खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मराठीसह हिंदी कलाविश्वातील काही कलाकारांनी मुंबईत हक्काचं खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. अशातच हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील एका लोकप्रिय अभिनेता अभिषेक कुमारने आलिशान फ्लॅट खरेदी करत नव्या घरातील गृहप्रवेशाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
अभिषेक कुमारने छोट्या पड्यावरील उडारियॉं मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. दमदार अभिनय आणि गुडलूक्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याने आपला भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्याची स्वप्नपूर्ती झाली आहे. “ईश्वर के आशीर्वाद से नए आंगन में पहला कदम - सपनों का घर अब अपना है... असं सुंदर कॅप्शन देत त्याने नव्या झलक शेअर केली आहे. नुकताच अभिनेत्याने त्याच्या या घरात गृहप्रवेश केला आहे. दरम्यान, अभिषेकने खरेदी केलेल्या या नव्या घराबद्दल मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिषेक कुमार आजवर अनेक कलाकृतींमध्ये काम केलं आहे. मात्र, त्याला खरी ओळख बिग बॉस मुळे मिळाली. या शोच्या तो अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. याशिवाय तो बिग बॉसच्या १७ व्या सीझनचा विजेता ठरला. अभिषेक कुमार 'उडारियां' मधील अमरिक सिंग विर्क आणि 'बेकाबू' मधील आदित्य रायचंद या भूमिकांसाठी आजही ओळखला जातो. सध्या हा अभिनेता पती पत्नी और पंगा या रिअॅलिटी शोमध्ये पाहायला मिळतोय.