"प्रियाला रिप्लेस केल्यानंतर मला दडपण आलं होतं...", तेजस्विनी लोणारी म्हणाली- "तिने कमबॅक केलेलं पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 16:54 IST2025-09-24T16:53:48+5:302025-09-24T16:54:06+5:30
प्रिया 'तुझेच मी गात आहे' मालिकेत काम करत होती तेव्हाच तिला कर्करोगाचं निदान झालं होतं. प्रियानंतर अभिनेत्री तेजस्वी लोणारीने तिला रिप्लेस केलं होतं.

"प्रियाला रिप्लेस केल्यानंतर मला दडपण आलं होतं...", तेजस्विनी लोणारी म्हणाली- "तिने कमबॅक केलेलं पण..."
मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचं काही दिवसांपूर्वीच कर्करोगाने निधन झालं. प्रियाच्या अचानक झालेल्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. प्रिया 'तुझेच मी गात आहे' मालिकेत काम करत होती तेव्हाच तिला कर्करोगाचं निदान झालं होतं. या मालिकेत ती मोनिका हे पात्र साकारायची. त्यानंतर तब्येतीच्या कारणास्तव तिने मालिका सोडली होती. प्रियानंतर अभिनेत्री तेजस्वी लोणारीने तिला रिप्लेस केलं होतं. प्रियाच्या निधनानंतर तेजस्विनीने तिच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
तेजस्विनीने सकाळला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रियाबद्दल म्हणाली, "मला आताही अंगावर शहारे येतात. जेव्हा तिला रिप्लेस करायचं होतं तेव्हा मी विचारलं होतं की काय कारण आहे? रिप्लेसमेंट होती तर त्यांना मला कारण सांगावं लागलं. मग मी प्रियाशी बोलले. पण, असं होईल असं मला वाटलं नव्हतं. कारण तिने छान कमबॅक केलं होतं. ती अमेरिकेला होती तिने नाटकही केलं. एक महिन्याचा दौरा केला. ती दुसरी सिरीयलही करत होती".
पुढे ती म्हणाली, "माझी तिची भेट तशी कमी व्हायची. पण, ती खूप सुंदर व्यक्ती होती. तिला रिप्लेस केल्यानंतर मला एक महिना दडपण होतं. प्रियाला रिप्लेस करणं म्हणजे...तिचं मराठी, तिची बोलण्याची पद्धत..तिची भूमिकेवरची जरब छान होती. त्यामुळे तिच्याकडून सल्ले घेण्याची हिंमत झाली नाही. मी म्हटलं आपलं काम आपण करूया. मला खूप वाईट वाटलं. तिच्या अंत्यसंस्काराला जाता आलं नाही कारण मला बरं नव्हतं. पण, एवढी तरुण अभिनेत्री गेली याचा विचारच करू शकत नाही".