'या' प्रसिद्ध जोडीने गुपचूप उरकले लग्न? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 10:43 IST2026-03-26T10:35:58+5:302026-03-26T10:43:40+5:30
लोकप्रिय जोडीनं एका खाजगी समारंभात लग्नगाठ बांधली असल्याचं बोललं जात आहे.

'या' प्रसिद्ध जोडीने गुपचूप उरकले लग्न? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
पंजाबी मुंडा करण कुंद्रा आणि आपली सगळ्यांची लाडकी मराठमोळी तेजस्वी प्रकाश हे इंडस्ट्रीतलं सर्वात क्युट कपल आहे. २०२१ साली 'बिग बॉस १५'मध्ये दोघं सहभागी झाले होते. तेव्हापासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. सोशल मीडियावर कायमच ते एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करताना दिसतात. तसंच काही वर्षांपासून ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. करण आणि तेजस्वी कधी लग्न करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. आता अशातच करण आणि तेजस्वीनं गुपचूप लग्न उरकल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांनी एका खाजगी समारंभात लग्नगाठ बांधली असल्याचं बोललं जात आहे. बुधवारी, एका युजरने आपल्या 'X' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर लिहिले, "जोपर्यंत एखादी गोष्ट कायमस्वरूपी होत नाही, तोपर्यंत ती खाजगीच ठेवा. अभिनंदन, करण आणि तेजस्वी! तुमच्या आयुष्यातील या नव्या पर्वासाठी अनेक शुभेच्छा". या पोस्टसोबतच एक फोटोही शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये तेजस्वी करण कुंद्राच्या मिठीत असल्याचे दिसत आहे. मात्र, या अफवांबाबत करण किंवा तेजस्वी या दोघांपैकी कोणीही अद्याप कोणतेही निवेदन किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही.
Keep it private until it's permanent 🧿❤️
— 1D_tuk_ a_chonce (@1d_tuk) March 25, 2026
congratulations @kkundrra@itsmetejasswi, best wishes for unlocking new chapter of your lives 🥰 pic.twitter.com/hEKwsfGkmQ
कामाबदद्ल बोलायचं झालं तर तेजस्वी प्रकाश अनेक हिंदी टीव्ही मालिकांमध्ये झळकली आहे. ती नागिन या मालिकेतही दिसली होती. तर करण कुंद्रा हा छोट्या पडद्यावरचा सुपरस्टार म्हणून लोकप्रिय आहे. बिग बॉसच्या घरात असताना दोघांमध्ये प्रेम फुललं असलं तरी त्यांची पहिली भेट ही एका दिवाळी पार्टीत झाली होती. तेजस्वीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या करणने त्याच्या छातीवर अभिनेत्रीचा टॅटू काढला आहे. सध्या ते दोघेही लाफ्टर शेफमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.