"नशिबवान नाही, खूप मेहनत केली, अनेकदा रडत..." तेजश्री प्रधानची भावनिक पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 11:09 IST2026-02-23T11:07:59+5:302026-02-23T11:09:25+5:30

तेजश्रीनं एक खास फोटो शेअर केलाय. पण, या फोटोपेक्षा तिने या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनची सोशल मीडियावर अधिक चर्चा रंगली आहे.

Tejashri Pradhan Inspirational Post On Struggle She Is Not Lucky Quote | Veen Doghantli Hi Tutena | "नशिबवान नाही, खूप मेहनत केली, अनेकदा रडत..." तेजश्री प्रधानची भावनिक पोस्ट चर्चेत

"नशिबवान नाही, खूप मेहनत केली, अनेकदा रडत..." तेजश्री प्रधानची भावनिक पोस्ट चर्चेत

तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. तिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले. तेजश्री सोशल मीडियावर सक्रीय असते. विविध फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते. अशातच तेजश्रीनं एक खास फोटो शेअर केलाय. पण, या फोटोपेक्षा तिने या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनची सोशल मीडियावर अधिक चर्चा रंगली आहे.

तेजश्रीनं स्वत:चा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.  हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, "लोक म्हणतात की ती नशीबवान आहे. पण, नाही, ती नशिबवान नाही. तिने खूप मेहनत केली आहे. तिने आपली माणसं गमावली आहेत. तिने उशिरापर्यंत जागून काम केले आहे. ती अनेकदा रडत-रडत झोपली आहे. तिने टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले आणि स्वत:कडे लक्ष दिले. तिला कित्येक वेळा हार मानावीशी वाटली… पण तिने हार मानली नाही. कारण, तिच्या मते, हार मानणं हा पर्यायच नाही".


तेजश्रीच्या या पोस्टला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी तिच्या जिद्दीचं आणि प्रामाणिकपणाचं कौतुक केलं आहे. एकाने लिहिले, "तू तर गोड आहेसच, पण कॅप्शनही खूप छान आहे". दुसऱ्याने लिहिले, "खूप सुंदर". दरम्यान, तेजश्री प्रधान सध्या तिच्या झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या लोकप्रिय मालिकेमुळे चर्चेत आहे. यात ती स्वानंदीची भूमिका साकारतेय तर सुबोध भावे समरची भूमिका निभावतो आहे. 

Web Title : तेजश्री प्रधान का भावनात्मक पोस्ट: मेहनत से मिली सफलता, भाग्य से नहीं।

Web Summary : अभिनेत्री तेजश्री प्रधान का एक भावनात्मक सोशल मीडिया पोस्ट वायरल हो रहा है। उन्होंने भाग्य से ज्यादा मेहनत पर जोर दिया है। उन्होंने बताया कि कैसे उन्होंने अपने प्रियजनों को खोया और रातों को जागकर काम किया। तेजश्री ने हार न मानने की बात कही है। वह जी मराठी के 'वीण दोघांतली ही तुटेना' में काम कर रही हैं।

Web Title : Tejashree Pradhan's emotional post about hard work, not luck, goes viral.

Web Summary : Actress Tejashree Pradhan's emotional social media post is creating buzz. She emphasizes hard work over luck, recalling lost loved ones and sleepless nights. She highlights resilience, ignoring critics, and refusing to give up despite wanting to. Currently, she is in Zee Marathi's 'Veen Dogantali Hi Tutena'.