"लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ नक्की कोण?", तेजश्री प्रधानने प्रश्न विचारताच CM फडणवीस खळखळून हसले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 16:35 IST2026-01-08T16:33:26+5:302026-01-08T16:35:23+5:30
तेजश्रीने मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत रॅपिड फायर खेळ खेळला. यामध्ये तिने फडणवीसांना "लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ कोण आहे? तुम्ही, एकनाथ शिंदे की अजित दादा?" असा प्रश्न विचारला. तेजश्रीचा प्रश्न ऐकताच देवेंद्र फडणवीस खळखळून हसले.

"लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ नक्की कोण?", तेजश्री प्रधानने प्रश्न विचारताच CM फडणवीस खळखळून हसले, म्हणाले...
राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी नेते मंडळी मैदानात उतरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात प्रचार सभा घेत असून त्यांनी ठाणे शहरातही हजेरी लावली होती. ठाण्यात अभिनेत्री तेजश्री प्रधानने जनतेच्या मनातील प्रश्न विचारत फडणवीसांना बोलतं केलं. या मुलाखतीवेळी स्थानिक वृत्तपत्राचे संपादक मिलिंद बल्लाळही उपस्थित होते.
तेजश्रीने मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत रॅपिड फायर खेळ खेळला. यामध्ये तिने फडणवीसांना "लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ कोण आहे? तुम्ही, एकनाथ शिंदे की अजित दादा?" असा प्रश्न विचारला. तेजश्रीचा प्रश्न ऐकताच देवेंद्र फडणवीस खळखळून हसले. उत्तर देत ते म्हणाले, "आम्ही तिघेही त्यांचे लाडके भाऊ आहोत. आम्हा तिघांवरही त्यांचं प्रेम आहे. आणि लाडक्या बहिणींनी तिघांनाही भरभरून दिलं आहे. म्हणूनच आम्ही या ठिकाणी सत्तेत आहोत".
"लाँग ड्राइव्ह आवडतं का?" असा प्रश्नही तेजश्रीने मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर ते म्हणाले, "मला लाँग ड्राइव्ह फार आवडतं. मी रात्री १२ वाजता निघतो, ३ वाजेपर्यंत ड्रायव्हिंग करतो. ठाणे, पनवले सगळीकडे मी लाँग ड्राइव्ह करतो. खुपदा असं होतं की पोलीस गाडी थांबवतात आणि मग मला पाहून एकदम आश्चर्यचकित होतात". "कोणत्या पक्षातून नेते येत्यात हे तुम्ही AI ला विचारलंय का" तेजश्रीच्या या प्रश्नावर फडणवीस हसले. ते म्हणाले, "हे काही आम्ही AIला विचारलेलं नाही. कारण आमच्या नेत्यांचा इंटिलिजिंस हा AI पेक्षा जास्त आहे". तेजश्रीने मुख्यमंत्री फडणवीसांना आणखीही काही प्रश्न विचारले ज्याची त्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली.