'होणार सून ती ह्या घरची'; तेजश्री प्रधान-सुबोध भावेच्या नव्या मालिकेची उत्सुकता, कुठे अन् कधी सुरु होणार?

By देवेंद्र जाधव | Updated: June 22, 2025 09:33 IST2025-06-22T09:33:32+5:302025-06-22T09:33:50+5:30

तेजश्री प्रधान-सुबोध भावेची नवी मालिका कधी आणि कुठे बघायला मिळणार, याविषयी सविस्तर जाणून घ्या. दोघांच्या मालिकेची सर्वांना उत्सुकता आहे

tejashri pradhan and subodh bhave new serial on zee marathi coming soon | 'होणार सून ती ह्या घरची'; तेजश्री प्रधान-सुबोध भावेच्या नव्या मालिकेची उत्सुकता, कुठे अन् कधी सुरु होणार?

'होणार सून ती ह्या घरची'; तेजश्री प्रधान-सुबोध भावेच्या नव्या मालिकेची उत्सुकता, कुठे अन् कधी सुरु होणार?

काल सोशल मीडियावर एका गोष्टीची चांगलीच चर्चा रंगली. ती गोष्ट म्हणजे तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे या दोघांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा. इन्स्टाग्रामवर एकमेकांना टॅग करुन तेजश्री-सुबोधने त्यांच्या मालिकांची नावं वेगळ्या अंदाजात चाहत्यांना सांगितली. त्यामुळे दोघांच्या नवीन मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही नवी मालिका कुठे आणि कधी सुरु होणार, याविषयी जाणून घ्या. 

तेजश्री-सुबोधची नवी मालिका

तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांनी आजवर कधीही एकत्र मालिकेत काम केलं नाही. तेजश्री-सुबोधने गेल्या वर्षी २०२४ मध्ये रिलीज झालेल्या 'हॅशटॅग तदैव लग्नम' सिनेमात काम केलं. पण मालिकेत मात्र दोघे झळकले नव्हते. अखेर दोघं पहिल्यांदाच मालिकेत झळकणार आहेत. तेजश्री - सुबोधने काल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, 'होणार सून ती ह्या घरची', 'तुला पाहते रे'. म्हणजेच सुबोध-तेजश्रीने एकमेकांच्या मालिकांची वेगळ्या अंदाजात नावं घेतली. त्यामुळे त्यांच्या नवीन मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


 


तेजश्री-सुबोधची नवी मालिका कुठे सुरु होणार?

तेजश्री-सुबोधने ज्या मालिकांची नावं घेतली त्या सर्व मालिका झी मराठीवर गाजल्या आहेत. त्यामुळे तेजश्री-सुबोधची ही नवी मालिका सुद्धा झी मराठीवर पाहायला मिळेल. ही मालिका कधी सुरु होणार याची अधिकृत  घोषणा झाली नसली तरीही पुढील महिन्यात अर्थात जुलै २०२५ मध्ये या दोघांची ही नवी मालिका पाहायला मिळेल. अनेक वर्षांनंतर तेजश्री-सुबोधला झी मराठीवरील मालिकेत पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत, यात शंका नाही.

Web Title: tejashri pradhan and subodh bhave new serial on zee marathi coming soon