पहिल्यांदाच दिसणार शिवानी सोनारचा डॅशिंग अवतार, अभिनेत्रीची झी मराठीच्या नव्या मालिकेत वर्णी, प्रोमो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 10:53 IST2025-07-11T10:52:44+5:302025-07-11T10:53:03+5:30
झी मराठी वाहिनीवर 'तारिणी' ही नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेतून शिवानी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत शिवानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'तारिणी' मालिकेचा प्रोमो समोर आला असून यामध्ये शिवानीचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे.

पहिल्यांदाच दिसणार शिवानी सोनारचा डॅशिंग अवतार, अभिनेत्रीची झी मराठीच्या नव्या मालिकेत वर्णी, प्रोमो समोर
'राजा राणीची गं जोडी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सोनार नव्या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. शिवानीची झी मराठीच्या नव्या मालिकेत वर्णी लागली आहे. झी मराठी वाहिनीवर 'तारिणी' ही नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेतून शिवानी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत शिवानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'तारिणी' मालिकेचा प्रोमो समोर आला असून यामध्ये शिवानीचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे.
या मालिकेत शिवानी 'तारिणी' ही स्पेशल क्राइम युनिट ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रोमोमध्ये घरात पूजेचं वातावरण असल्याचं दिसत आहे. तर तारिणी त्याची तयारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण तरीही तिला सगळे टोमणे मारताना दिसत आहेत. मात्र, त्याच तारिणीचा नंतर वेगळाच रुद्र अवतार पाहायला मिळत आहे. घर आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत तारिणी दृष्टांचा संहार करत सगळ्यांची तारणहार होते. ही मालिका लवकरच झी मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
शिवानी सोनारसोबत या मालिकेत अभिनेता स्वराज नागरगोजे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिज्ञा भावे, आरती वाबगावकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'तारिणी' मालिकेचा प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. या प्रोमोवर कमेंट करत चाहत्यांनी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.