'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील अंजली भाभीने केला हुस्न है सुहाना गाण्यावर धमाकेदार डान्स, पहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 18:30 IST2020-12-25T18:30:00+5:302020-12-25T18:30:02+5:30

'संतान' मालिकेतून छोट्या पडद्यावरील तिने आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली.

Tarak mehta ka ulta chashma show anjali bhabhi sunayna fozdar dance on husn hai suhana song | 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील अंजली भाभीने केला हुस्न है सुहाना गाण्यावर धमाकेदार डान्स, पहा व्हिडीओ

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील अंजली भाभीने केला हुस्न है सुहाना गाण्यावर धमाकेदार डान्स, पहा व्हिडीओ

'तारक मेहता का उल्टा  चश्मा'मध्ये अंजली भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुनैना फौजदारने कुली नंबर वनमधील 'हुसन है सुहाना' या गाण्यावर शानदार डान्स केला आहे. सुनैना  फौजदारने तिच्या डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो चाहत्यांना आवडला आहे.  '1990 च्या दशकातील असण्याचा मला अभिमान आहे. या गाण्यांमुळे मला नृत्य आणि अभिनय करण्याची प्रेरणा मिळाली. असे कॅप्शन सुनैनाने तिच्या डान्स व्हिडिओला दिले आहे. आज ख्रिसमसच्या दिवशी वरुण धवन आणि सारा अली खानचा ‘कुली नंबर 1’ सिनेमा रिलीज झाला आहे, जो गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या 1995 च्या कुली नंबर 1 चित्रपटाचा रीमेक आहे.

सुनैना फौजदारने संतान मालिकेतून छोट्या पडद्यावरील कारकीर्दीला सुरूवात केली होती. यानंतर राईट लेफ्ट राईट, मित मिलादे रब्बा, हमसे है लाईफ, यम है हम, बेलनवाली बहू अशा मालिकांमध्ये ती झळकली.

अंजली भाभीची भूमिका साकारणा-या नेहा मेहताने मालिकेला सोडल्यानंतर तिच्या जागी काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सुनैना फौजदारची एंट्री झाली. सुनैना सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. सुनैनाचे इंस्टाग्रामवर जवळपास २ लाख ३३ हजार फॉलोव्हर्स आहेत. 
 

Web Title: Tarak mehta ka ulta chashma show anjali bhabhi sunayna fozdar dance on husn hai suhana song