दिलीप जोशींच्या आधी 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ऑफर झालेला 'जेठालाल'चा रोल, पण दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 15:48 IST2025-07-01T15:48:31+5:302025-07-01T15:48:48+5:30
दिलीप जोशींआधी ही भूमिका एका बॉलिवूड अभिनेत्याला ऑफर झाली होती. एवढंच नव्हे तर तब्बल चार अभिनेत्यांनी हा रोल करण्यास नकार दिला होता.

दिलीप जोशींच्या आधी 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ऑफर झालेला 'जेठालाल'चा रोल, पण दिला नकार
'तारक मेहता का उलटा चष्मा' ही टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय मालिका. गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, तारक मेहता, भिडे अंकल, बबीता, डॉ हाथी ही पात्र घराघरात पोहोचली आहेत. मालिकेत जेठालालची भूमिका साकारून अभिनेता दिलीप जोशींनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. पण, दिलीप जोशींआधी ही भूमिका एका बॉलिवूड अभिनेत्याला ऑफर झाली होती. एवढंच नव्हे तर तब्बल चार अभिनेत्यांनी हा रोल करण्यास नकार दिला होता.
सगळ्यात आधी बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला जेठालालच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. राजपाल यादव यांचं कॉमिक टायमिंग सगळ्यांनाच माहितीये. त्यामुळेच त्यांना या रोलची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्यांनी नकार दिला. त्यानंतर कॉमेडियन अली असगरला जेठालालच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. पण, इतर प्रोजेक्टमुळे त्यांनीदेखील ही भूमिका करण्यास नकार दिला.
द कपिल शर्मा शो फेम कीकू शारदा आणि स्टँड अप कॉमेडियन एहसान कुरैशी यांनादेखी जेठालालच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. मात्र दोघांनीही तेव्हा नकार दिला होता. भाभीजी घर पर है फेम योगेश त्रिपाठीलाही जेठालालच्या रोलसाठी ऑफर होती. मात्र अभिनेत्याने हा रोल नाकारला आणि शेवटी दिलीप जोशींची मालिकेत एन्ट्री झाली. 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील जेठालालने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली.