तारक मेहता का उल्टा चष्मामधील रिटाने मालिकेच्या दिग्दर्शकासोबतच केले आहे लग्न, पाहा तिचे हॉट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 05:24 PM2019-07-03T17:24:53+5:302019-07-03T17:26:56+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत रिटा प्रेक्षकांना खूपच कमी भागांत पाहायला मिळत असली तरी प्रेक्षकांची ती प्रचंड लाडकी आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Rita Reporter aka Priya Ahuja Rajda is a hottie in real life | तारक मेहता का उल्टा चष्मामधील रिटाने मालिकेच्या दिग्दर्शकासोबतच केले आहे लग्न, पाहा तिचे हॉट फोटो

तारक मेहता का उल्टा चष्मामधील रिटाने मालिकेच्या दिग्दर्शकासोबतच केले आहे लग्न, पाहा तिचे हॉट फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देप्रियाच्या खऱ्या आयुष्याविषयी सांगायचे तर तिचे लग्न हे तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सुरेश राजदासोबत झाले आहे. त्या दोघांची ओळख याच मालिकेच्या सेटवर झाली होती.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेला अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दयाबेन ही भूमिका दिशा वाकानी साकारत होती. ती गेल्या कित्येक महिन्यांपासून गायब असून ती मालिकेत परतणार कधी याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. आता या मालिकेत तिची जागा विभूती शर्मा ही अभिनेत्री साकारणार असल्याची चर्चा आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत रिटा प्रेक्षकांना खूपच कमी भागांत पाहायला मिळत असली तरी प्रेक्षकांची ती प्रचंड लाडकी आहे. रिटा एका वाहिनीवर रिपोर्टरचे काम करत असून गोकुळधाममधील लोकांच्या मदतीसाठी ती नेहमीच धावून येते. या मालिकेत रिटाची भूमिका प्रिया आहुजा राजदा साकारत असून तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या रिटा म्हणजेच प्रियाविषयी आम्ही तुम्हाला आज काही खास गोष्टी सांगणार आहोत. प्रिया या मालिकेत अतिशय सिम्पल लुकमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत असली तरी खऱ्या आयुष्यात ती खूपच ग्लॅमरस आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्याला तिचे अनेक बोल्ड फोटो पाहायला मिळतात. हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतात. 

प्रियाच्या खऱ्या आयुष्याविषयी सांगायचे तर तिचे लग्न हे तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सुरेश राजदासोबत झाले आहे. त्या दोघांची ओळख याच मालिकेच्या सेटवर झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. 

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Rita Reporter aka Priya Ahuja Rajda is a hottie in real life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.