तारक मेहता का उल्टा चष्मामधील ही अभिनेत्री आहे गरोदर, शेअर केले मॅटर्निटी शूटचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 19:43 IST2019-11-01T19:42:02+5:302019-11-01T19:43:18+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Priya Ahuja aka Rita Reporter flaunts her baby bump; shares pics from her maternity shoot | तारक मेहता का उल्टा चष्मामधील ही अभिनेत्री आहे गरोदर, शेअर केले मॅटर्निटी शूटचे फोटो

तारक मेहता का उल्टा चष्मामधील ही अभिनेत्री आहे गरोदर, शेअर केले मॅटर्निटी शूटचे फोटो

ठळक मुद्देप्रिया गरोदर असून तिनेच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे ही गुड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली होती. आता तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर मॅटर्निटी फोटो शूटचे काही फोटो पोस्ट केले असून या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेला अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत रिटा प्रेक्षकांना खूपच कमी भागांत पाहायला मिळत असली तरी प्रेक्षकांची ती प्रचंड लाडकी आहे. रिटा एका वाहिनीवर रिपोर्टरचे काम करत असून गोकुळधाममधील लोकांच्या मदतीसाठी ती नेहमीच धावून येते. या मालिकेत रिटाची भूमिका प्रिया आहुजा राजदा साकारत असून ती गेल्या काही महिन्यांपासून या मालिकेत आपल्याला पाहायला मिळत नाहीये.

प्रिया गरोदर असून तिनेच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे ही गुड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली होती. आता तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर मॅटर्निटी फोटो शूटचे काही फोटो पोस्ट केले असून या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोत आपल्याला तिच्या पतीला म्हणजेच मालव राजदाला देखील पाहायला मिळत आहे. मालव राजदा तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाचा दिग्दर्शक असून त्या दोघांची ओळख याच मालिकेच्या सेटवर झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

प्रियाने नोव्हेंबर 2018 मध्ये दिग्दर्शक मालव राजदासह लग्न केले.  त्या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. दोघेही सध्या खूप खुश असून बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.  

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Priya Ahuja aka Rita Reporter flaunts her baby bump; shares pics from her maternity shoot