Shocking! तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील अभिनेत्याच्या मुलीचे झाले निधन, कुटुंबावर पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 12:25 IST2019-05-10T12:00:22+5:302019-05-10T12:25:08+5:30

छोटीशी मुलगी घरात असताना प्लास्टीकच्या खेळण्यासोबत खेळत होती. या प्लास्टिकच्या खेळण्याचा काही भाग खेळताना तुटला आणि तिने खेळता खेळता तो तुटलेला भाग तोंडात टाकला.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Pratish Vora's 2-year-old daughter dies in unfortunate accident | Shocking! तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील अभिनेत्याच्या मुलीचे झाले निधन, कुटुंबावर पसरली शोककळा

Shocking! तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील अभिनेत्याच्या मुलीचे झाले निधन, कुटुंबावर पसरली शोककळा

ठळक मुद्देकाल रात्री ती तिच्या खेळण्यासोबत खेळत होती. त्यावेळी त्यातील काही भाग तिने गिळला. कोणाला लक्षात यायच्या आतच हे सगळे घडले.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या काही भागांमध्ये प्रतिश वोरा या अभिनेत्याने काम केले होते. त्याची या मालिकेतील भूमिका छोटीशी असली तरी ती प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षातत राहिली होती. त्याच्या दोन वर्षांच्या मुलीचे नुकतेच निधन झाले असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे. प्रतिशची मुलगी घरात असताना प्लास्टीकच्या खेळण्यासोबत खेळत होती. या प्लास्टिकच्या खेळण्याचा काही भाग खेळताना तुटला आणि तिने खेळता खेळता तो तुटलेला भाग तोंडात टाकला आणि कोणाच्या लक्षात यायच्या आतच तिने ते गिळले. खेळणे घशात अडकल्यामुळे तिचा लगेचच मृत्यू झाला. 

प्रतिश वोराने टेलिचक्करशी बोलताना सांगितले की, काल रात्री ती तिच्या खेळण्यासोबत खेळत होती. त्यावेळी त्यातील काही भाग तिने गिळला. कोणाला लक्षात यायच्या आतच हे सगळे घडले.

प्रतिश वोरा हा कामानिमित्त मुंबईत राहात असला तरी तो मुळचा राजकोटचा आहे. त्यामुळे त्याच्या मुलीवर अंतिम संस्कार हे राजकोट येथे होणार असून तिचे पार्थिव घेऊन आज सकाळी विमानाने तो आणि त्याची पत्नी राजकोटला रवाना झाले आहेत. 

प्रतिशच्या सोशल मीडिया साईटवर त्याच्या मुलीचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. ती फारच गोंडस होती. तो तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि त्याचे फॅन्स देखील या फोटोंना भरभरून प्रतिसाद देत असत. प्रतिशच्या मुलीच्या अकस्मित निधनाचा धक्का त्यांच्या कुटुंबीयांना बसला आहे. पण त्याचसोबत फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील दुःखाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. 

प्रतिशने तारक मेहता का उल्टा चष्मा प्रमाणेच क्राईम पेट्रोल या कार्यक्रमाच्या देखील काही भागांमध्ये काम केले आहे. सध्या तो स्टार भारत या वाहिनीवरील प्यार का पापड या फॅमिली ड्रामा मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत असून या मालिकेत तो साकारत असलेल्या नंदू गुप्ता या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. 

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Pratish Vora's 2-year-old daughter dies in unfortunate accident