दिशा वाकानीला फॅन्सने सुनावले, तुमच्यात इतका इगो असेल असे वाटले नव्हते... यावर दिशाने दिले हे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 12:27 IST2019-05-29T12:25:53+5:302019-05-29T12:27:22+5:30

दिशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकताच तिच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. पण तिने आधीच स्पष्ट केले होते की, कोणीही तिला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेविषयी विचारू नये.

Taarak Mehta Ka Ooltah chashmah Fans slam Disha Vakani For Not coming on show | दिशा वाकानीला फॅन्सने सुनावले, तुमच्यात इतका इगो असेल असे वाटले नव्हते... यावर दिशाने दिले हे उत्तर

दिशा वाकानीला फॅन्सने सुनावले, तुमच्यात इतका इगो असेल असे वाटले नव्हते... यावर दिशाने दिले हे उत्तर

ठळक मुद्देफॅनने म्हटले की, तुमच्यात इतका इगो असेल असे मला वाटले नव्हते. तुमचे फॅन्स तुम्हाला बोलावून कंटाळले आहेत. पण तुम्ही या मालिकेत का परतत नाही आहात... दिशाला फॅनने सुनावल्यानंतर तिने देखील लगेचच यावर उत्तर दिले. ती म्हणाली, कृपया करून मला माझी स्पेस द्या... 

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दया ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांची प्रचंड लाडकी असून या मालिकेत दिशा वाकानी ही भूमिका साकारत आहे. ती गेल्या काही महिन्यांपासून या मालिकेत नसल्याने तिचे फॅन्स तिची आतुरतेने वाट पाहात आहेत. तिने मालिकेत परतावे यासाठी तिचे फॅन्स सोशल मीडियावर देखील तिला मेसेज करत आहेत. 

दिशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकताच तिच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. चाहत्यांशी बोलण्यापूर्वी तिने आधीच स्पष्ट केले होते की, तिच्याविषयी, तिच्या खाजगी जीवनाविषयी लोक विचारू शकतात... पण कोणीही तिला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेविषयी विचारू नये. पण असे असूनही तिच्या एका फॅनने तिला तारक मेहता क उल्टा चष्मा या मालिकेत ती परतत नसल्याबद्दल सुनावले. तिच्या फॅनने म्हटले की, तुमच्यात इतका इगो असेल असे मला वाटले नव्हते. तुमचे फॅन्स तुम्हाला बोलावून कंटाळले आहेत. पण तुम्ही या मालिकेत का परतत नाही आहात... दिशाला फॅनने सुनावल्यानंतर तिने देखील लगेचच यावर उत्तर दिले. ती म्हणाली, कृपया करून मला माझी स्पेस द्या... 

तसेच दिशाला तिच्या फॅन्सने सध्या चित्रीकरण करत नसल्याने तुम्ही काय करत आहात असा देखील प्रश्न विचारला त्यावर सध्या मी माझ्या बाळासोबत वेळ घालवत असल्याचे तिने सांगितले. 

दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती. पण तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून गेल्या कित्येक महिन्यांपासून दूर आहे. दिशाने या मालिकेसाठी पुन्हा चित्रीकरण सुरू केले असल्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. पण त्याबाबत दिशा किंवा या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी काहीही न बोलणेच पंसत केले होते. 

दिशाच्या परतण्याबाबत असित कुमार मोदी यांनी एका वृत्तवाहिनीशी काही दिवसांपूर्वी बोलताना सांगितले होते की, दया या मालिकेत परत कधी येईल याची सगळेजण आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यामुळे ही व्यक्तिरेखा लवकरच प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे. दिशा परत येण्याची शक्यता खूपच जास्त आहे. पण त्याचसोबत आम्ही काही अभिनेत्रींशी देखील या भूमिकेबाबत चर्चा करत आहोत.

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah chashmah Fans slam Disha Vakani For Not coming on show