बबीताजी संतापली, टप्पूही भडकला...! अफेअरच्या बातम्यांवर म्हणाला, फक्त विचार करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 12:11 PM2021-09-13T12:11:05+5:302021-09-13T12:15:01+5:30

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : काल मुनमुन दत्ता अफेअरच्या बातम्यांवर चांगलीच संतापली होती. आता टप्पू अर्थात राज यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

taarak mehta ka ooltah chashmah fame raj anadkat quash dating rumours with munmun dutta |  बबीताजी संतापली, टप्पूही भडकला...! अफेअरच्या बातम्यांवर म्हणाला, फक्त विचार करा...

 बबीताजी संतापली, टप्पूही भडकला...! अफेअरच्या बातम्यांवर म्हणाला, फक्त विचार करा...

googlenewsNext
ठळक मुद्देमुनमुन दत्ता 2008 सालापासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचा भाग आहे. तर टप्पू अर्थात राजने 2017 मध्ये शोमध्ये एन्ट्री घेतली होती.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या छोट्या पडद्यावरच्या गाजलेल्या मालिकेतील टप्पू आणि बबीताजी यांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. बबीताजीची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि टप्पूची भूमिका साकारणारा राज अनादकत  (Raj Anadkat) रिलेशनशिपमध्ये असून दोघांच्या कुटुंबीयांनाही याची माहिती असल्याचा दावा बातम्यांमध्ये करण्यात आला होता. या बातम्यांवर मुनमुन दत्ता चांगलीच संतापली होती. काल तिने सोशल मीडियावर दोन पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला होता. आता टप्पू अर्थात राज यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राजची पोस्ट..

इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये राज म्हणतो, ‘जे कुणी माझ्याबद्दल अशा बातम्या लिहित आहेत त्यांनी जरा विचार करा की, या बनावट बातम्यांचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो. माझ्या संमतीशिवाय माझ्याबद्दल काहीही लिहिलं जातंय. अशा बातम्या लिहिणाºया सर्जनशील लोकांनी आपली सर्जनशीलता अन्य गोष्टींमध्ये दाखवावी. देव, अशा लोकांना सद्बुद्धी देवो.’
 
बबीता काय म्हणाली?

काल बबीता अर्थात मुनमुन दत्ताने या बातम्यांवर आपला संताप व्यक्त केला होता. ‘मला तुमच्याकडून यापेक्षा खूप चांगल्या अपेक्षा होत्या. पण कमेंट्समध्ये जी घाण तुम्ही ओतली, त्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे, तथाकथित  सुशिक्षीत  असूनही आपण एका मागासलेल्या समाजाचा भाग आहोत.  केवळ स्वत:च्या मजेसाठी एखाद्या महिलेच्या वयावर, तिच्या संबंधांवर नको ते  बोलून तिला लाजीरवाणं केलं जातं. मग या विनोदामुळे भलेही एखादी व्यक्ती मेंटल ब्रेकडाऊनच्या अवस्थेत गेली तरी तुम्हाला फरक पडत नाही. मी गेल्या 13 वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करतेय. पण माज्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगायला तुम्हाला 13 मिनिटंही लागली नाहीत.  तुमचे शब्द एखाद्याला आत्महत्या करायला भाग पाडतील, त्याआधी फक्त एकदा विचार करा. तुमचे शब्द एखाद्याला टोकाचं पाऊल उचलण्यासाठी प्रवृत्त तर करत नाहीत ना, याचा विचार करा. आज मला स्वत:ला भारताची लेक म्हणताना लाज वाटतेय,’ असं ती म्हणाली होती.

मुनमुन दत्ता 2008 सालापासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचा भाग आहे. तर टप्पू अर्थात राजने 2017 मध्ये शोमध्ये एन्ट्री घेतली होती. राज व मुनमुन यांच्या अफेअरच्या बातम्या येताच लोकांनी मुनमुनला तिच्या वयावरून ट्रोल करणं सुरू केलं. मुनमुन 33 वर्षांची आहे तर राज 24 वर्षांचा आहे. 

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah fame raj anadkat quash dating rumours with munmun dutta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.