अखेर दयाबेन परतणार...! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवरून आली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 17:32 IST2021-02-08T17:31:03+5:302021-02-08T17:32:37+5:30

चाहत्यांची उत्सुकता शिगेला

taarak mehta ka ooltah chashmah dayaben return in show brother sunderlal confirms | अखेर दयाबेन परतणार...! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवरून आली गुडन्यूज

अखेर दयाबेन परतणार...! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवरून आली गुडन्यूज

ठळक मुद्देदिशा वकानी सप्टेंबर 2017 पासून  मालिकेपासून लांब होती.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या सेटवरून एक धमाकेदार गुडन्यूज आलीये. होय, चाहत्यांची लाडकी दयाबेन मालिकेत परतली आहे. गेल्या तीन वर्षांपासून दयाबेन मालिकेतून गायब होती. ती पुन्हा परतते, याची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत होते. पण अखेर आता ती पुन्हा गोकुलधाम सोसायटीत येतेय. दयाबेन मालिकेत परतत असल्याची बातमी  स्वत: दयाबेनचा भाऊ सुंदर कन्फर्म केली आहे.  
मालिकेत जेठालालच्या साळ्याची आणि दयाबेनच्या भावाची भूमिका साकारणा-या सुंदरने ही गुड न्यूज देताच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मालिकेच्या एपिसोडमध्ये सुंदर जेठालालच्या घरी पोहोचतो आणि दयाबेन येणार असल्याची बातमी देतो. दयाबेनने लिहिलेले पत्रही तो जेठालालला देतो. दयाबेन येणार असल्याच्या बातमीने आणि तिच्या पत्राने जेठालाल भावूक होत आनंदाने नाचू लागतो. मालिकेत दयाबेनची भूमिका दिशा वकानी हिने साकारली आहे. दयाबेनची अनोखी डायलॉग डिलीव्हरी आणि हसण्याची स्टाईल चांगलीच लोकप्रिय झाली होती. यामुळे प्रेक्षक तिच्यावर फिदा झाले होते. मात्र आई झाल्यानंतर तिने शो ला अलविदा म्हटले होते.

दिशा वकानी सप्टेंबर 2017 पासून  मालिकेपासून लांब होती. मधल्या काळात दिशा वकानीचा पती आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये दिशाच्या चित्रीकरणाच्या वेळा व मानधनावरून वाद झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच दिशाने निर्मात्यांसमोर काही अटी ठेवल्याचेही म्हटले गेले होते.
दिशा वकानी मालिकेत नव्हती त्यावेळी निर्मात्यांनी तिच्या जागी दुस-या कोणालाही घेतले नाही. गोकुळधाममधील संपूर्ण महिलांमध्ये दिशा वकानी सर्वाधित फी घेते. केवळ महिलाच नाही तर येथे प्रत्येक कलाकारापेक्षा दिशा वकानी अधिक पैसे घेते. 
 

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah dayaben return in show brother sunderlal confirms