तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील हा अभिनेता गेल्या साडे तीन वर्षांपासून आहे बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 16:41 IST2019-05-17T16:16:15+5:302019-05-17T16:41:40+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गोकुळधाम सोसायटीत राहाणाऱ्या व्यक्तिरेखा या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पण कथानकाच्या गरजेनुसार काही नवीन कलाकार आपल्याला मालिकेच्या वेगवेगळ्या भागात पाहायला मिळतात.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah actor Vishal thakkar is missing since december 2015 | तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील हा अभिनेता गेल्या साडे तीन वर्षांपासून आहे बेपत्ता

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील हा अभिनेता गेल्या साडे तीन वर्षांपासून आहे बेपत्ता

ठळक मुद्देविशाल ठक्कर 2015 पासून अचानक गायब झाला आहे. तो सध्या कुठे आहे? याबाबत कोणतीही माहिती कुटुंबीयांना अद्याप मिळालेली नाही.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेली अनेक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत गोकुळधाम सोसायटीत राहाणाऱ्या व्यक्तिरेखा या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पण कथानकाच्या गरजेनुसार काही नवीन कलाकार आपल्याला मालिकेच्या वेगवेगळ्या भागात पाहायला मिळतात. या मालिकेच्या काही भागांमध्ये विशाल ठक्कर या अभिनेत्याने काम केले होते. तुम्हाला माहीत आहे का, विशाल गेल्या अनेक वर्षांपासून बेपत्ता आहे. त्याच्याविषयी काहीच माहिती त्याच्या कुटुंबियांना नाहीये. 

 

विशाल ठक्कर 2015 पासून अचानक गायब झाला आहे. तो सध्या कुठे आहे? याबाबत कोणतीही माहिती कुटुंबीयांना अद्याप मिळालेली नाही. सध्या विशालचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी विशाल बेपत्ता असल्याची माहिती काही वर्षांपूर्वीच मीडियाला दिली होती. त्यांनी सांगितले होते की, विशाल 31 डिसेंबर 2015 ला आईकडून 500 रुपये घेऊन चित्रपट पाहायला गेला होता. त्यानंतर त्याने आईला फोन करून तो मित्रांसोबत थर्टी फर्स्टची पार्टी करायला जात असल्याचं कळवलं आणि सकाळी तो घरी परत येईल असं त्याने सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी 2016 ला त्याने दुपारी एकच्या सुमारास फेसबुकवर हॅपी न्यू ईयरची पोस्ट टाकली होती. त्याआधी साडे अकराच्या सुमारास त्याला घोडबंदर रोडवर त्याच्या प्रेयसीसोबत पाहण्यात आले होते. तेव्हापासून तो बेपत्ता आहे. 

 

विशाल बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या प्रेयसीकडे याबाबत चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी तिने तो रिक्षा पकडून फिल्मसिटीमध्ये शूटींगसाठी गेल्याचे पोलिसांना सांगितले होते. बेपत्ता होण्यापूर्वी काही महिन्याआधी विशाल आणि त्याच्या प्रेयसीमध्ये मोठा वाद झाला होता. प्रेयसीने विशालवर बलात्कार आणि अत्याचाराचे आरोप लावले होते. मात्र त्यानंतर प्रेयसीने तिची तक्रार मागे घेतली होती. 

विशालने मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात देखील काम केले होते. त्याने या चित्रपटात प्रेमप्रकरणातून निराश होऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची भूमिका साकारली होती. त्याव्यतिरिक्त त्याने चांदनी बार, टँगो चार्ली या चित्रपटात काम केले होते. विशालने अनेक मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.
 

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah actor Vishal thakkar is missing since december 2015