सोनू तू बदल गई रे...! तुफान व्हायरल होतोय ‘तारक मेहता...’मधील भिडे मास्तरांच्या लेकीचा हा बिकिनी व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 14:30 IST2021-06-06T14:28:27+5:302021-06-06T14:30:27+5:30

Video: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील जुनी सोनू अर्थात निधी भानुशाली सध्या जाम चर्चेत आहे.   होय, निधीचा एक बिकिनी व्हिडीओ सध्या जाम व्हायरल होतोय.  

taarak mehta ka ooltah chashma sonu aka nidhi bhanushali bikini Video viral | सोनू तू बदल गई रे...! तुफान व्हायरल होतोय ‘तारक मेहता...’मधील भिडे मास्तरांच्या लेकीचा हा बिकिनी व्हिडीओ

सोनू तू बदल गई रे...! तुफान व्हायरल होतोय ‘तारक मेहता...’मधील भिडे मास्तरांच्या लेकीचा हा बिकिनी व्हिडीओ

ठळक मुद्दे‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये आत्माराम तुकाराम भिडे यांच्या मुलीची भूमिका निधीने साकारली होती. अनेक वर्षे ही भूमिका साकारल्यानंतर तिने ही भूमिका सोडली होती.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah ) या मालिकेतील जुनी सोनू अर्थात निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) सध्या जाम चर्चेत आहे.   होय, निधीचा एक बिकिनी व्हिडीओ सध्या जाम व्हायरल होतोय.  इतकेच नाही तर तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्सही दिल्या आहेत. सोनू तू बदल गई रे..., व्वा हीच का आमची सोनू, अशा भन्नाट कमेंट्स युजर्सनी दिल्या आहेत.
सोनू सध्या तिचा अभ्यास आणि पर्सनल लाईफ एन्जॉय करतेय. अ‍ॅक्टिंगच्या दुनियेपासून ती दूर आहे. पण सोशल मीडियावर मात्र कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. आता तिने जंगलातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती जंगलाच्या मधोमध असलेल्या एका तलावात एन्जॉय करताना दिसतेय.  सध्या तिचा हा बिकिनी लूकमधील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 निधीच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. आत्तापर्यंत 1 लाखांवर लोकांनी हा विहडीओ पाहिला आहे.
 ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये आत्माराम तुकाराम भिडे यांच्या मुलीची भूमिका निधीने साकारली होती. अनेक वर्षे ही भूमिका साकारल्यानंतर गेल्यावर्षी तिने ही भूमिका सोडली होती.

अभ्यासाला वेळ देता यावा म्हणून तिने ही मालिका सोडली होती. आता तिच्याजागी पलक सिंधवानी सोनूची भूमिका साकारते आहे. निधी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधून बाद झाली पण सोशल मीडियावर मात्र ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.  
 सर्वप्रथम सोनूची भूमिका झील मेहताने साकारली होती. 9 वर्षांच्या वयापासूनच झीलने या मालिकेत काम करणे सुरु केले होते. पण तिनेही अभ्यासासाठी ही मालिका सोडली होती. तिच्या नंतर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये निधी भानूशालीची एन्ट्री झाली होती. निधी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. इन्स्टावर तिचे असंख्य फॉलोअर्स आहेत.

Web Title: taarak mehta ka ooltah chashma sonu aka nidhi bhanushali bikini Video viral