TMKOC : जेनिफरच्या आरोपांनंतर शोचे एक्स डायरेक्टर काय म्हणाले? "असित मोदी सेटवर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 11:27 AM2023-05-18T11:27:16+5:302023-05-18T11:28:19+5:30

'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

taarak mehta ka ooltah chashma ex director malav rajda on jennifer mistry allegations | TMKOC : जेनिफरच्या आरोपांनंतर शोचे एक्स डायरेक्टर काय म्हणाले? "असित मोदी सेटवर..."

TMKOC : जेनिफरच्या आरोपांनंतर शोचे एक्स डायरेक्टर काय म्हणाले? "असित मोदी सेटवर..."

googlenewsNext

Taarak Mehta Ka Ooltah Chashma : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने (Jennifer Mistry) निर्माते असित मोदींवर (Asit Modi) गंभीर आरोप केले आहेत. तिने मालिकेत रोशन सोढी या पात्राच्या पत्नीची भूमिका साकारली. तर आता जेनिफरला शोचे आधीचे दिग्दर्शक मालव राजदा (Malav Rajda) यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता असित मोदींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

एकंदर या सर्व प्रकरणारवर एक्स डायरेक्टर मालव राजदा म्हणाले," मी १४ वर्ष मालिकेच्या सेटवर काम केलं आहे. असित मोदी सेटवर सर्वात जास्त मिळूनमिसळून राहायचे. ते सर्वांसोबत चांगले राहतात. मग ती टेक्निकल टीम असो, डायरेक्शन टीम किंवा डिओपी, मेकअप टीम असो ते सर्व सहकलाकारांसोबतही चांगलं वागायचे. त्यांनी कधीच माझ्यासमोर तरी कोणासोबत वाईट कृत्य केलं नाही."

मालव राजदा जेनिफरबद्दल बोलताना म्हणाले,"तिच्यावर सेटवर उशिरा येण्याचे आरोप लावले गेले. पण माझ्यासमोर तरी कधी तसं झालेलं मी पाहिलं नाही. सगळेच कलाकारांना मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये थोडाफार उशीर व्हायचाच. यात फक्त जेनिफरलाच दोष देणं अयोग्य आहे. तसंच ती सगळ्यांसोबत मिळूनमिसळून राहायची. ती सेटवर एकमेव महिला होती जी पुरुषांसोबतही बसायची, जेवायची. जर त्यांच्याबाबतीत तिची ही तक्रार असेल तर ती अशी सर्वांसोबत बसली नसती."

जेनिफरने एएनआयशी बोलताना असित मोदींवर पुन्हा आरोप केले. ती म्हणाली,"त्यांनी माझं शारिरीक शोषण केलं नाही. मात्र ते माझ्याशी अश्लील भाषेत बोलायचे, फ्लर्ट करायचे. मी हे सगळं पैशांसाठी करत नाही तर सत्य समोर यावं म्हणून बोलत आहे. असित मोदींना हे मान्य करावंच लागेल की त्यांनी माझ्यासोबत चुकीचं केलं आहे."

Web Title: taarak mehta ka ooltah chashma ex director malav rajda on jennifer mistry allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.