तू चाल पुढं! ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटीमधून मराठी अभिनेत्रीने मिळवली मास्टर्स डिग्री, चाहत्यांकडून होतंय कौतुक
By कोमल खांबे | Updated: August 13, 2025 12:42 IST2025-08-13T12:35:45+5:302025-08-13T12:42:51+5:30
अन्विताने एक गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. अन्विताने मास्टर्स डिग्री मिळवली आहे.

तू चाल पुढं! ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटीमधून मराठी अभिनेत्रीने मिळवली मास्टर्स डिग्री, चाहत्यांकडून होतंय कौतुक
'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत स्वीटूची भूमिका साकारून अभिनेत्री अन्विता फलटणकर घराघरात पोहोचली. या मालिकेने अन्विताला प्रसिद्धी मिळवून दिली. अन्विताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. अन्विता चाहत्यांना सोशल मीडियावरुन अपडेट्स देत असते. नुकतंच अन्विताने एक गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. अन्विताने मास्टर्स डिग्री मिळवली आहे.
अभिनेत्रीने ऑस्ट्रेलियातील 'युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न'मधून पदवीनंतरचं मास्टर्सचं शिक्षण पूर्ण केलं आहे. नुकतंच तिचा कॉन्व्होकेशन सेनेमनी पार पडला. याचे फोटो अन्विताने सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. कॉन्व्होकेशन सेरेमनीसाठी अन्विता खास साडी नेसून गेली होती. "मी मास्टर्स डिग्री पूर्ण केली" असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे. अन्विताच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतो आहे. तर चाहते आणि सेलिब्रिटींनीही कमेंट करत अभिनेत्रीचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे.
अन्विताने मालिकांसोबतच सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'टाइमपास ३', 'टाइमपास', 'यू टर्न' या सिनेमांमध्ये ती झळकली आहे. तर गर्ल्स सिनेमात ती मुख्य भूमिकेत होती. सध्या अन्विता कलाविश्वापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.