‘नकळत सारे घडले’मध्ये स्वानंद किरकिरे लावणार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 16:45 IST2018-07-24T16:44:44+5:302018-07-24T16:45:17+5:30

या सिनेमात ते प्रसन्ना ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. हाच प्रसन्ना आणि मालिकेतल्या प्रिन्स दादाची योगायोगाने भेट होते. त्यांच्यात गप्पाही होतात.

 Swaraj can be done in 'Unclean' | ‘नकळत सारे घडले’मध्ये स्वानंद किरकिरे लावणार हजेरी

‘नकळत सारे घडले’मध्ये स्वानंद किरकिरे लावणार हजेरी

‘नकळत सारे घडले’ या मालिकेत नुकतंच एका खास पाहुण्याने हजेरी लावली. हा पाहुणा होता सुप्रसिद्ध गायक-संगीतकार स्वानंद किरकिरे. अक्षय कुमारची प्रस्तुती असलेल्या 'चुंबक' सिनेमाच्या प्रमोशनसाठी स्वानंदजी ‘नकळत सारे घडले’च्या सेटवर आले होते. या सिनेमात ते प्रसन्ना ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. हाच प्रसन्ना आणि मालिकेतल्या प्रिन्स दादाची योगायोगाने भेट होते. त्यांच्यात गप्पाही होतात.

झटपट पैसा कमावण्याच्या नादात कसं नुकसान होतं याचे धडेच प्रसन्ना प्रिन्सदादाला देतो. त्यामुळे प्रिन्स दादाचे डोळेच उघडतात. हा प्रसन्ना म्हणजे खुद्द स्वानंद किरकिरे.आपल्या अफलातून अभिनयानं स्वानंद किरकिरे यांनी ‘नकळत सारे घडले’ मालिकेतील प्रसंग रंगवला आहे. त्यामुळे हा भाग नक्कीच रंजक  होणार आहे.स्वानंदजींसोबत काम करण्याचं स्वप्न ‘नकळत सारे घडले’ या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण झालंय. सीनपूर्वी खूप दडपण होतं मात्र स्वानंदजींनी मला खुप धीर दिला आणि सीन सहजरित्या पार पडला अशी भावना प्रिन्सची भूमिका साकारणा-या आशिष गाडेने व्यक्त केली.

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार प्रस्तुत करत असलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे यावरून आपण विचार करू शकता की यात नक्कीच काही विशेष असेल. अक्षयला सिनेमा एवढा आवडला की त्यांनी सिनेमाला आणि कलाकारांना भरभरून प्रतिसाद दिला. अक्षयने चित्रपट पाहिल्यानंतर याची प्रस्तुती करण्याचे ठरविले. स्वानंद किरकिरे पुढे सांगतात की , एका निरागस आणि आत्ममग्न पुरुषाची व्यक्तिरेखा मला साकारायची होती. आपल्या आसपासच्या लोकांचे निरीक्षण करत आणि त्याच्या जोडीला या क्षेत्रातील डॉक्टर आणि समुपदेशक यांच्याशी चर्चा करत ही व्यक्तिरेखा मी साकारली आहे. ही व्यक्तिरेखा आम्ही एक एक वीट रचावी तशी अभ्यासत आणि साकारात गेलो. 
 

Web Title:  Swaraj can be done in 'Unclean'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.