स्वप्नील बांदोडकरचा घराघरात गुंजणार आवाज, 'या' मालिकेचे गायले शिर्षक गीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 11:50 IST2019-04-09T11:47:36+5:302019-04-09T11:50:37+5:30

प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयीदेखील खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. मिळणार आहे.'साजणा' ही नवी मालिका १५ एप्रिलपासून रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

 Swapnil Bandodkar's voice will be heard in his house, singing the title of 'This' song | स्वप्नील बांदोडकरचा घराघरात गुंजणार आवाज, 'या' मालिकेचे गायले शिर्षक गीत

स्वप्नील बांदोडकरचा घराघरात गुंजणार आवाज, 'या' मालिकेचे गायले शिर्षक गीत

मालिका हिट होण्याचे श्रेय हे त्याचे शिर्षक गीतालाही जाते. जितके सुरेख शिर्षक गीत तितकी मालिका सुपरहिट असे समीकरणच बनले आहे. त्यामुळे जेव्हा नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येते. त्यावेळी तितकेच मेहनतही शिर्षक गीतासाठी संगीतकार घेत असतात. असेच एक शिर्षक गीताने अल्पावधीतच  हिट ठरते आहे. गायक स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेले हे गीत, किशोर कदम म्हणजेच कवी सौमित्र यांनी लिहिलेले आहे. अभिजित-विश्वजित या प्रसिद्ध जोडीने हे अप्रतिम गीत, संगीतबद्ध केले आहे. सगळ्याच गोष्टी उत्तम जमून आलेल्या असल्याने, हे गीत रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. शीर्षकगीत आवडू लागल्याने, प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयीदेखील खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. मिळणार आहे.'साजणा' ही नवी मालिका १५ एप्रिलपासून रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

 

या शीर्षक गीताविषयी बोलताना स्वप्नील बांदोडकरने सांगितले की, "एक अत्यंत सहजसुंदर असं हे गीत, लगेचच मनाला भावतं. हे नितांतसुंदर गीत प्रेक्षकांना सतत ऐकत राहावंसं वाटेल याची मला खात्री वाटते. शीर्षकगीत प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचं मला कळले तेव्हा खूप आनंद झाला. म्हणूनच, प्रेक्षकांच्या अभिप्रायाचीदेखील मला खूप उत्सुकता आहे. गीत आपलंसं वाटत असल्याने, मालिका प्रदर्शित होण्याची उत्सुकता माझ्याही मनात आहे."


अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र व मुख्य अभिनेत्री पूजा बिरारी अशी नवीकोरी जोडी यानिमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका गावात या मालिकेचे कथानक घडताना पाहायला मिळेल. काही दिवसांपूर्वीच मालिकेचा  पहिलाच टीजर प्रेक्षकांना पसंत पडल्याने, या नव्या कथानकाविषयी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. एका श्रीमंत घरातील मुलगा आणि एका गरीब घरातील मुलगी यांची ही प्रेमकथा रसिकांना पाहणे नक्कीच रंजक ठरणार असा विश्वास मालिकेच्या टीमने व्यक्त केला आहे. 

 
 

Web Title:  Swapnil Bandodkar's voice will be heard in his house, singing the title of 'This' song