मालिकेनंतर आता वेबसीरिजमध्ये दिसणार हा' मराठी अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 14:06 IST2019-04-20T13:50:46+5:302019-04-20T14:06:57+5:30

सिनेमा असो किंवा छोटा प्रत्येकाला वेबसीरिजने भुरळ घातलीच आहे. आता या यादीत आणखी एक नाव सामील झाले आहे ते सुयश टिळकचे.

Suyash tikal doing web series | मालिकेनंतर आता वेबसीरिजमध्ये दिसणार हा' मराठी अभिनेता

मालिकेनंतर आता वेबसीरिजमध्ये दिसणार हा' मराठी अभिनेता

ठळक मुद्देसुशय टिळक हे नाव का रे दुरावा या मालिकेनंतर घराघरात पोहोचले

सिनेमा असो किंवा छोटा प्रत्येकाला वेबसीरिजने भुरळ घातलीच आहे. आता या यादीत आणखी एक नाव सामील झाले आहे ते सुयश टिळकचे. सुशय सध्या एका वेबसीरिजचे शूटिंग करतोय. यात तो कोणती भूमिका साकारतोय वेबसीरिजचे नाव काय आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याचे चाहते ही वेबसीरिज पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील यात काही शंका नाही. 


सुशय टिळक हे नाव का रे दुरावा या मालिकेनंतर घराघरात पोहोचले. का रे दुरावा या मालिकेतील अभिनेता सुयश टिळक याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेत त्याने साकारलेली यश ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. सध्या सुयश एक घर मंतरलेलं मालिकेमध्ये क्षितिज निंबाळकर नावाची व्यक्तिरेखा साकारतोय. या मालिकेच्या निमित्ताने सुयश आणि सुरुची पुन्हा एकदा एकत्र आलेत.  क्षितिज हा एक नामवंत व्यवसायिक असून त्याला दुर्मिळ वस्तू गोळा करण्याचा छंद आहे.

त्याचबरोबर अतिशय तर्कशुद्ध विचार करणारा आणि कोणत्याही गोष्टीला न घाबरणारा असा क्षितिज कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार करून निर्णय घेतो. मृत्युंजय बंगला जिथे कोणीही विकत घ्यायला तयार नसताना केवळ अतिशय किरकोळ किमतीला मिळत असल्याने क्षितिज हा बंगला विकत घेतो तर या बंगल्यातील अनैसर्गिक गोष्टींचे गूढ उकलण्याचा प्रयत्न गार्गी (सुरुची अडारकर) करत आहे. 

Web Title: Suyash tikal doing web series