​सुयश राय आणि किश्वर मर्चंट नच बलियेमध्ये झळकणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 15:56 IST2017-02-23T10:26:56+5:302017-02-23T15:56:56+5:30

नच बलिये या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर या कार्यक्रमात कोणकोणते स्पर्धक झळकणार याची चर्चा मीडियात सुरू होते. सुयश राय आणि ...

Suyash Rai and Kishwar Merchant will not be seen in Nal Baliya | ​सुयश राय आणि किश्वर मर्चंट नच बलियेमध्ये झळकणार नाहीत

​सुयश राय आणि किश्वर मर्चंट नच बलियेमध्ये झळकणार नाहीत

बलिये या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर या कार्यक्रमात कोणकोणते स्पर्धक झळकणार याची चर्चा मीडियात सुरू होते. सुयश राय आणि किश्वर मर्चंट नच बलियेचा भाग होणार असल्याचे गेल्या कित्येक दिवसांपासून म्हटले जात होते. पण ते कामात व्यग्र असल्याने त्यांनी या कार्यक्रमाचा भाग न व्हायचे ठरवले आहे.
सुयश राय आणि किश्वर मर्चंट यांनी अनेक वर्षांच्या नात्यानंतर नुकतेच लग्न केले. सुयश आणि किश्वरची जोडी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडींमधील एक मानली जाते. बिग बॉसमध्येदेखील हे दोघे झळकले होते. किश्वर ही सुयशपेक्षा आठ वर्षांनी मोठी असल्यामुळे त्यांच्या लग्नाच्यावेळी किश्वरला काहीजणांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून टोमणेदेखील मारले होते आणि यावर सयशने त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. 
नच बलिये या कार्यक्रमात सुयश आणि किश्वर झळकणार असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. पण ते दोघे आता या कार्यक्रमाचा भाग नसणार नसल्याचे किश्वरने स्पष्ट केले आहे. किश्वरने एक ट्वीट करून याविषयी माहिती दिली आहे. तिने ट्वीट केले आहे की, आम्हाला सतत नच बलियेबद्दल विचारले जात आहे. आम्हाला नच बलियेबद्दल विचारण्यात आले होते हे खरे असले तरी आम्ही या कार्यक्रमाचा भाग नाही आहोत. 
किश्वर रायची ब्रम्हराक्षस ही मालिका नुकतीच संपली आहे. या मालिकेनंतर ती रंगभूमीवर तिचे लक्ष केंद्रित करणार असल्याचे तिने म्हटले होते. सेल्फी या तिच्या इंग्रजी नाटकाचे ती जगभर दौरे करणार आहे. याच कारणामुळे तिने नच बलियेला नकार दिला असल्याचे म्हटले जात आहे. 

Web Title: Suyash Rai and Kishwar Merchant will not be seen in Nal Baliya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.