सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे दिसणार बिग बॉसच्या घरात?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 03:47 PM2020-08-25T15:47:39+5:302020-08-25T15:48:06+5:30

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या 14 व्या सीझनला लवकरच सुरूवात होणार आहे.

Sushant Singh Rajput's ex-girlfriend Ankita Lokhande will be seen in Bigg Boss's house? | सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे दिसणार बिग बॉसच्या घरात?

सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे दिसणार बिग बॉसच्या घरात?

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या 14 व्या सीझनला लवकरच सुरूवात होणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोण कोण कलाकार सहभागी होणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या शोचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या शोचं नाव बदलून  बिग बॉस 2020 असे करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे या शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. 

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची एक्‍स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे या शोमध्ये सहभागी होण्याची चर्चा आहे. त्यातच बिग बॉसचे मेकर्स लवकरच अंकिता लोखंडेला अप्रोच करण्यासाठी प्लानिंग करत आहेत. अंकिता लोखंडेची खास मैत्रिण रश्‍मी देसाई ही मागील शोमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी अंकिताने रश्‍मीला सपोर्ट करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे आता अंकिता लोखंडे या शोची ऑफर स्वीकारते की नाही हे चित्र काही दिवसातच स्पष्ट होईल.

दरम्यान, अंकिता लोखंडे ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. झी टीव्हीच्या टॅलेंट हंट शो झी सिने स्टार की खोजमध्ये सहभागी झाल्यानंतर अंकिता पवित्र रिश्‍तामध्ये मुख्य भूमिकेत झळकली होती.

या मालिकेदरम्यानच अंकिता आणि सुशांतची ओळख झाली होती.

Web Title: Sushant Singh Rajput's ex-girlfriend Ankita Lokhande will be seen in Bigg Boss's house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.