प्रेग्नेंसीनंतर 3 महिन्यातच पूलमध्ये चील करताना दिसली ही अभिनेत्री, पाहा तिचा हॉट लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 13:48 IST2019-08-06T13:47:59+5:302019-08-06T13:48:23+5:30

हेट स्टोरी 2 फेम या अभिनेत्री तीन महिन्यांपूर्वीच गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

Surveen chawla share her hot photo on instagram | प्रेग्नेंसीनंतर 3 महिन्यातच पूलमध्ये चील करताना दिसली ही अभिनेत्री, पाहा तिचा हॉट लूक

प्रेग्नेंसीनंतर 3 महिन्यातच पूलमध्ये चील करताना दिसली ही अभिनेत्री, पाहा तिचा हॉट लूक

हेट स्टोरी 2 फेम या अभिनेत्री तीन महिन्यांपूर्वीच गोंडस बाळाला जन्म दिला आहे.  आम्ही बोलतोय, अभिनेत्री सुरवीन चावलाबद्दल. सुरवीन सध्या रिलेक्स मूडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसली आहे.

सोशल मीडियावर सुरवीनने तिचे हे हॉट फोटो सोशल मीडियावर फॅन्ससोबत शेअर केले आहेत. सुरवीने हे स्विमिंग पूल मधले फोटो तिच्या फॅन्सना देखील आवडले आहेत. त्यांनी आपली पसंती लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून दिली आहे.

सुरवीन सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. सुरवीनने १९ एप्रिलला मुलीला जन्म दिला. तिने ही खुषखबर सुद्धा सोशल मीडियावरचं सांगितली होती. 


सुरवीन चावलाने २०१५ साली व्यावसायिक अक्षय ठक्करसोबत इटलीत लग्न केले होते. तिने तब्बल दोन वर्षे लग्न केल्याचे वृत्त लपवून ठेवले होते. २०१७ साली तिने सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून लग्नाचा खुलासा केला होता. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव ईवा ठेवले आहे. ईवा हा इंग्रजी शब्द असून याचा अर्थ जीवनातील आई असा आहे.

सुरवीन चावलाने आपल्या करियरची सुरूवात एकता कपूरची लोकप्रिय मालिका कसौटी जिंदगी कीमधून केली होती. या मालिकेत तिने प्रेरणा व मि. बजाज यांच्या छोट्या मुलीची भूमिका केली होती. याशिवाय सुरवीनने हेट स्टोरी, पार्च्ड, क्रिएटर थ्रीडी यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. याशिवाय तिने काही वेबसीरिजमध्येदेखील काम केले आहे.

Web Title: Surveen chawla share her hot photo on instagram