पियुषसोबत लग्न केल्यानंतर बदललेल्या आयुष्याबाबत सुरुची अडारकरचा खुलासा, म्हणते - "आता मला सगळ्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 09:20 IST2024-01-11T09:20:20+5:302024-01-11T09:20:43+5:30

Suruchi Adarkar And Piyush Ranade : सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांनी ७ डिसेंबर रोजी गुपचूप लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

Suruchi Adarkar opens up about her changed life after marrying Piyush, says - "Now I have everything..." | पियुषसोबत लग्न केल्यानंतर बदललेल्या आयुष्याबाबत सुरुची अडारकरचा खुलासा, म्हणते - "आता मला सगळ्या..."

पियुषसोबत लग्न केल्यानंतर बदललेल्या आयुष्याबाबत सुरुची अडारकरचा खुलासा, म्हणते - "आता मला सगळ्या..."

मराठी कलाविश्वात गेल्या काही दिवसात अनेक मराठी कलाकार विवाहबंधनात अडकले आहेत. त्यातीलच एक जोडी म्हणजे सुरुची अडारकर आणि पियुष रानडे. त्या दोघांनी गुपचूप ७ डिसेंबर रोजी लग्न करत चाहत्यांना चकीत केले. लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली. लग्नानंतर सुरुचीने छोट्या पडद्यावर कमबॅक केले. सध्या ती 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत दिसतेय. या मालिकेत तिने विरोचकाचा साथीदाराची म्हणजे नागिणीची भूमिका साकारली आहे. दरम्यान आता लग्नानंतर तिच्या आयुष्यात काय बदल झाला, याचा खुलासा सुरुचीने केला आहे.

नुकतीच सुरुची अडारकरने ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ''सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत माझी भूमिका खूप वेगळी आहे. पियुष आणि मी कामाबद्दल एकमेकांशी फारसे बोलत नाही. मात्र जेव्हा त्याने टीव्हीवर माझ्या मालिकेचा प्रोमो पाहिला तेव्हा त्याला तो आवडला. तो म्हणाला की मी माझ्या करिअरमध्ये अशी भूमिका निवडल्यामुळे तो खूश आहे.' 

लग्नानंतर आयुष्यात झालेल्या बदलाबद्दल सुरुची म्हणाली की, 'लग्नानंतर माझ्या आयुष्यात खूप बदल झालाय. आधी मी माझं शूट संपवायचे आणि थेट घरी जायचे. माझी आई इतर गोष्टींची काळजी घ्यायची. आता मला सगळ्या गोष्टी स्वतःला कराव्या लागतायत. या सगळ्यात पियुषची मला खूप मदत होते. तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. आम्ही आमच्या घरातली कामं वाटून घेतली आहेत. आता मी घरातील सामान खरेदी करून आणते. घरातली इतर सगळी कामे करते. लग्नानंतर आयुष्यात अनेक बदलही झालेत. पण लग्नानंतर मला लगेच ही मालिका मिळाली हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.'
 

Web Title: Suruchi Adarkar opens up about her changed life after marrying Piyush, says - "Now I have everything..."