मेंहदी रंगली, हळद लागली! सूरज चव्हाण लग्नाआधीच्या विधींना सुरुवात, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 17:40 IST2025-11-28T17:40:41+5:302025-11-28T17:40:49+5:30
सूरज चव्हाणच्या लग्नापूर्वीच्या विधींना त्यांच्या नव्या घरी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.

मेंहदी रंगली, हळद लागली! सूरज चव्हाण लग्नाआधीच्या विधींना सुरुवात, पाहा व्हिडीओ
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सूरज त्याच्या मामाची मुलगी अर्थात संजना गोफणेसोबत लग्न करतोय. उद्या २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सासवड-जेजुरी याठिकाणी गुलिगत किंगचा थाटामाटात लग्नसोहळा पार पडणार आहे. सध्या दोघांच्या लग्नापूर्वी होणाऱ्या विधींचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
सूरज चव्हाणच्या लग्नापूर्वीच्या विधींना त्यांच्या नव्या घरी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या समारंभांमध्ये घाणा भरण्याचा कार्यक्रम, मेहंदी समारंभ आणि हळदी समारंभ देखील पारंपरिक पद्धतीने पार पडला. विधींना सुरुवात करण्याआधी सूरजने आपल्या आई-वडिलांच्या फोटोकडे पाहून दोघांनाही अभिवादन केले. यावेळी सूरजच्या सगळ्या बहिणींनी मिळून त्याचे औक्षण केले. त्यानंतर हळदी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला आणि सूरजला हळद लागली. या सर्व खास क्षणांची झलक व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.
सूरज चव्हाणच्या विवाहसोहळ्याची गेस्ट लिस्ट व्हायरल
सूरज चव्हाणच्या लग्नात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांपासून ते हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. उपमख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनित्रा अजित पवार, सुप्रिया सुळे, आमदार विजय बापू शिवतारे, संजय जगताप, अशोक टेकवडे हे दिग्गज राजकीय क्षेत्रातून प्रमुख उपस्थिती लावतील. तर या लग्नाचा सर्वात मोठा आकर्षण बिंदू म्हणजे मनोरंजन विश्वातून येणारे दिग्गज असतील. केवळ मराठी नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठी नावे या यादीत आहेत. तसेच सूरजच्या लग्नाला 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वातील कलाकार उपस्थित राहतील.