बिग बॉसच्या घरात गाजलेला गोलीगत पॅटर्न! स्वतःचा प्रवास बघून सूरज चव्हाणला अश्रू अनावर, प्रोमो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 09:06 IST2024-10-02T09:05:40+5:302024-10-02T09:06:39+5:30

सूरज चव्हाण स्वतःचा प्रवास बघताना भावुक झालेला दिसला. (suraj chavan, bigg boss marathi 5)

suraj chavan emotional while see his own journey in bigg boss marathi 5 | बिग बॉसच्या घरात गाजलेला गोलीगत पॅटर्न! स्वतःचा प्रवास बघून सूरज चव्हाणला अश्रू अनावर, प्रोमो व्हायरल

बिग बॉसच्या घरात गाजलेला गोलीगत पॅटर्न! स्वतःचा प्रवास बघून सूरज चव्हाणला अश्रू अनावर, प्रोमो व्हायरल

बिग बॉस मराठीची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सीझनमध्ये एक नाव चांगलंच गाजलं ते म्हणजे सूरज चव्हाण. झापुकझुपुक म्हणत सूरज चव्हाणने आता बिग बॉसच्या टॉप ७ मध्ये मजल मारली आहे. सूरजचा बिग बॉस मराठीमधील प्रवास हा सर्वांसाठी निश्चित एक प्रेरणादायी प्रवास आहे. सुरुवातीला बिग बॉसमध्ये गप्प असणारा आणि टास्कमध्ये कमी पडत असलेल्या सूरजने नंतर मात्र उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम मिळवलं. आज सूरजला बिग बॉस त्याचा प्रवास दाखवणार आहेत.

सूरज हा संपूर्ण महाराष्ट्राचा सुपुत्र

बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो नुकताच भेटीला आलाय. या प्रोमोत शिव ठाकरे सुरुवातीला सूरज सूरज असं ओरडताना दिसतो. सूरज झापुकझुपुक, गोलीगत असे डायलॉग म्हणत उत्साहात एन्ट्री घेतो. "आपण माझेच काय तर सबंध महाराष्ट्राचे सुपुत्र आहात, असं म्हणत बिग बॉस सूरजचं स्वागत करतात. या सीझनमध्ये अनेक पॅटर्न बघायला मिळाले. पण या घरात गाजला तो म्हणजे गोलीगत पॅटर्न. असं म्हणत बिग बॉस सूरजचं कौतुक करतात. पुढे कुटुंबाचे फोटो बघताना सूरजचे डोळे पाणावतात.


 सूरज टॉप ५ मध्ये जाणार का?

सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या फायनलमध्ये मजल मारणार का हे दोन दिवसात कळेल. कारण सूरज या आठवड्यात नॉमिनेट आहे. परंतु सूरजला मिळणारा सपोर्ट बघता तो टॉप ५ मध्ये नक्कीच असेल यात काही शंका नाही. सूरजचं घरात पॅडी कांबळेसोबत चांगलं नातं निर्माण झालं होतं. पॅडीनेही जाता जाता मी आयुष्यभरासाठी सूरजचं पालकत्व घेतलंय, असं म्हणाला होता. त्यामुळे बिग बॉस संपल्यावरही सूरज - पॅडीमध्ये असलेलं मैत्रीपूर्ण नातं प्रेक्षकांना बघायला मिळेल.

Web Title: suraj chavan emotional while see his own journey in bigg boss marathi 5