​सुनील ग्रोव्हर करणार एन्टरटेन्मेंट के लिये कुछ भी करेगाचा नवा सिझन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 15:03 IST2017-04-29T09:33:34+5:302017-04-29T15:03:34+5:30

एन्टरटेन्मेंट के लिये कुछ भी करेगा या कार्यक्रमाचा नवा सिझन प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील ...

Sunil Grover will do a new season of entertainment for doing entertainment | ​सुनील ग्रोव्हर करणार एन्टरटेन्मेंट के लिये कुछ भी करेगाचा नवा सिझन

​सुनील ग्रोव्हर करणार एन्टरटेन्मेंट के लिये कुछ भी करेगाचा नवा सिझन

्टरटेन्मेंट के लिये कुछ भी करेगा या कार्यक्रमाचा नवा सिझन प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील ग्रोव्हर करणार असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात चांगलेच भांडण झाले होते. कपिल आणि त्याची टीम सिडनीला एक स्टेज शो करायला गेले होते. त्यावेळी विमानातून परतत असताना कपिलने नशेच्या भरात सुनील आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांना शिव्या घातल्या होत्या. एवढेच नव्हे तर सुनीलला त्याने चप्पलेने चोपले होते. या प्रसंगानंतर कपिलसोबत काम करायचेच नाही असे सुनीलने ठरवले आहे आणि त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून सुनील द कपिल शर्मा शोचे चित्रीकरण करत नाहीये. सुनील नसल्यामुळे या मालिकेचा टिआरपी ढासळला आहे. त्याला परत आणण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून कपिल प्रयत्न करत आहे. पण काहीही झाले तरी कपिलच्या कार्यक्रमात परतायचे नाही असे सुनीलने ठरवले आहे.
सुनीलचा सोनी या वाहिनीसोबत करार असल्याने द कपिल शर्मा सोडल्यानंतर दुसऱ्या एखाद्या मालिकेत काम करण्याचे त्याने मान्य केले असल्याचे म्हटले जात आहे. एन्टरटेन्मेंट के लिये कुछ भी करेगा या कार्यक्रमाचे आतापर्यंचचे सगळे सिझन गाजले होते. या कार्यक्रमाचा पुढील सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील करणार असल्याची चर्चा आहे. याआधीच्या सिझनमध्ये मोना सिंग आणि विशाल सिंग सूत्रसंचालकाच्या भूमिकेत झळकले होते. 
एन्टरटेन्मेंट के लिये कुछ भी करेगा या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनमध्येदेखील अन्नू मलिक आणि फराह खान परीक्षकाच्या भूमिकेत झळकणार आहेत. हा कार्यक्रम जुलैत प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Sunil Grover will do a new season of entertainment for doing entertainment