'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्याच्या लेकीचा थाटात पार पडला बारसा, त्याची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 19:30 IST2023-04-08T19:29:39+5:302023-04-08T19:30:14+5:30

या अभिनेत्याने सोशल मीडियावर क्युट फोटो शेअर करत बाप झाल्याचे सांगितले होते.

'Sundara Manamadhye Bharli' fame actor's daughter name ceremony, his wife is also a famous actress. | 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्याच्या लेकीचा थाटात पार पडला बारसा, त्याची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्याच्या लेकीचा थाटात पार पडला बारसा, त्याची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेता ऋषीकेश शेलार आणि पत्नी स्नेहा काटे यांना १२ जानेवारी २०२३ रोजी कन्यारत्न प्राप्ती झाली होती. मुलीचा बाप झालो असे म्हणत त्याने एक क्युटसा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तेव्हा त्यांच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केला. नुकतेच ऋषीकेश आणि स्नेहा यांच्या लेकीचे मोठ्या थाटात बारसा पार पडला. त्यांनी लेकीचं नाव रुही ठेवलं आहे. रुही नावाचा अर्थ देखील खूपच सुंदर आहे. एका संगीताचा सूर, फुल, एक आत्मा असा या नावाचा अर्थ होतो. रुहीचा अर्थ काळजाला भिडणारी असाही होतो. 

रुहीच्या बारशाचे काही खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे बारसे मोठ्या थाटातमाटात पार पडलेले पाहायला मिळाले. या सोहळ्याला त्यांच्या जवळच्या नातेवाईक आणि खास मित्रांना त्यांनी आमंत्रित केले होते. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील कलाकारांंनी बारशाला हजेरी लावली होती. त्यांंचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.


ऋषीकेशने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत दौलतची भूमिका गाजवली होती. सध्या तो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत काम करते आहे. ही त्याची प्रमुख भूमिका असलेली पहिली मालिका आहे. त्यामुळे यासाठी तो खूप मेहनत घेतो आहे. या मालिकेचं कथानक ग्रामीण भागातील असल्यामुळे संपूर्ण शूटिंग कोल्हापुरातच होत आहे. एक श्रीमंत घराण्यातील मुलगा आपल्याच शाळेतील शिक्षिकेच्या प्रेमात पडतो पण त्याच्या आईचा ह्याला संपूर्णपणे विरोध असतो असं हे कथानक सध्या चांगलंच गाजताना पाहायला मिळत आहे.

Web Title: 'Sundara Manamadhye Bharli' fame actor's daughter name ceremony, his wife is also a famous actress.