सुमोना चक्रवर्ती 'द कपिल शर्मा शो'च्या एका एपिसोडसाठी घेते इतकं मानधन, आकडा वाचून व्हाल अवाक्...

By गीतांजली | Updated: December 3, 2020 19:00 IST2020-12-03T19:00:00+5:302020-12-03T19:00:02+5:30

अभिनेत्री आणि कॉमेडियन सुमोना चक्रवर्ती ही 'द कपिल शर्मा शो' मधील सर्वात जुन्या कलाकारांपैकी एक आहे.

Sumona chakravarti fees in the the kapil sharma show | सुमोना चक्रवर्ती 'द कपिल शर्मा शो'च्या एका एपिसोडसाठी घेते इतकं मानधन, आकडा वाचून व्हाल अवाक्...

सुमोना चक्रवर्ती 'द कपिल शर्मा शो'च्या एका एपिसोडसाठी घेते इतकं मानधन, आकडा वाचून व्हाल अवाक्...

अभिनेत्री आणि कॉमेडियन सुमोना चक्रवर्ती ही 'द कपिल शर्मा शो' मधील सर्वात जुन्या कलाकारांपैकी एक आहे. 'कॉमेडी सर्कस' मध्ये ती कपिल शर्मासोबतही होती. 'द कपिल शर्मा शो' मध्ये ती भुरीची भूमिका साकारत आहे आणि तिच्या अभिनयाची, नृत्याची, विनोदाच्या टाइमिंगने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 


पण तुम्हाला माहिती आहे का की 'द कपिल शर्मा शो' मध्ये काम करण्यासाठी सुमोना किती पैसे घेते?  पण हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की ती कपिल शर्मा, भारती सिंग, चंदन प्रभाकर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक आणि जज अर्चना पूरन सिंगपेक्षा कमी पैसे घेते.


2-3 लाख एका एपिसोडसाठी 
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सुमोना 'द कपिल शर्मा शो'चा भाग घेण्यासाठी 2-3 लाख रुपये घेते, म्हणजे वीकेंड एपिसोडसाठी के 4-6 लाख रुपये घेते. तर इतर कलाकार प्रत्येक भागासाठी पाच लाख किंवा त्याहून अधिक रक्कम घेतात.  पण या मानधनातही सुमोना खूप खूश आहे. ती सांगते की तिच्या कामाच्या तुलनेत ती खूप चांगली रक्कम आहे.


सुमोनाला सोशल मीडियावर 10 लाख फॉलोवर्स 
सुमोनाला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. अलीकडेच, इन्स्टाग्रामवर तिचे 10 लाख फॉलोअर्स झाले आहेत. ज्याबद्दल तिने आनंद व्यक्त करत आपल्या चाहत्यांचे आभार मानले होते. 
 

Web Title: Sumona chakravarti fees in the the kapil sharma show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.