सुमीत राघवनच्या टवागले की दुनिया’ने गाठला ५०० एपिसोड्सचा टप्‍पा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 06:26 PM2022-11-09T18:26:56+5:302022-11-09T18:30:18+5:30

सोनी सब वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'वागले की दुनियाने' नुकतंच ५०० भागांचा टप्पा गाठला आहे.

Sumit Raghavan's wagale Ki Dunya serial completed the milestone of 500 episodes! | सुमीत राघवनच्या टवागले की दुनिया’ने गाठला ५०० एपिसोड्सचा टप्‍पा!

सुमीत राघवनच्या टवागले की दुनिया’ने गाठला ५०० एपिसोड्सचा टप्‍पा!

googlenewsNext

सोनी सब वाहिनीवरील लोकप्रिय मालिका वागले की दुनियाने नुकतंच ५०० भागांचा टप्पा गाठला. गेल्‍या वर्षी सुरू झालेल्‍या या मालिकेने रंजक कथा सादर करून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍यासोबत त्‍यांना भावूक देखील केले आहे,  सुमित राघवन, परीवा प्रणती, चिन्मयी साळवी, शीहान कपाही, अंजन श्रीवास्तव, भारती आचरेकर या कलाकारांनी मालिकेत सादर केलेल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 

आपला आनंद व्‍यक्‍त करत सुमीत राघवन म्‍हणाला, “आम्‍हाला प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम व पाठिंबा पाहून आनंद होत आहे. आम्‍ही त्‍यांच्‍या अपेक्षांची पूर्तता करण्‍यासाठी नेहमी अथक मेहनत घेत राहू. माझ्यासाठी राजेश फक्‍त भूमिका नाही, तर माझा अंश आहे, जो मला प्रेक्षकांसमोर सादर करायला आहे. या ५०० एपिसोड्समधून टीमचे प्रयत्‍न आणि प्रेक्षकांचा सातत्‍यपूर्ण पाठिंबा दिसून येतो. मी आशा करतो की, आम्‍ही ही मालिका करत राहू आणि आमच्‍या कथानकाच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍यासोबत त्‍यांना मदत देखील करू.’’


५०० एपिसोड्सच्‍या प्रवासाबाबत सांगताना परिवा प्रणती ऊर्फ वंदना वागले म्‍हणाली, “वंदना व राजेशची भूमिका कोणत्‍याही आधुनिक जोडप्‍याच्‍या जीवनाशी संलग्‍न आहेत. मालिकेमध्‍ये सादर केल्‍या जाणाऱ्या समस्‍यांमधून दैनंदिन जीवनाच्‍या स्थितींना दाखवले जाते, ज्या आपण सर्व आपल्‍या जीवनात सामना करतो. असे वास्‍तविक सादरीकरण आम्‍हाला प्रेक्षकांशी सहजपणे संलग्‍न करते. मला आनंद होत आहे की, मालिकेने ५०० एपिसोड्सचा टप्‍पा गाठला आहे आणि आमचा पुढे मोठा प्रवास आहे, ज्‍यासाठी मी खूपच उत्‍सुक आहे.’’ 

Web Title: Sumit Raghavan's wagale Ki Dunya serial completed the milestone of 500 episodes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.