"बोलण्यासारखं खुप आहे पण..."; 'बाळूमामा' साकारणाऱ्या सुमित पुसावळेची मालिका सोडताना खास पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 19:19 IST2024-03-02T19:17:54+5:302024-03-02T19:19:21+5:30

गेली अनेक वर्ष बाळूमामाच्या नावाने चांगभलं मालिकेत भूमिका साकारणाऱ्या सुमित पुसावळेने मालिका सोडताना खास पोस्ट लिहीली आहे.

sumeet pusavale emotional post about balumamachya navan changbhala serial | "बोलण्यासारखं खुप आहे पण..."; 'बाळूमामा' साकारणाऱ्या सुमित पुसावळेची मालिका सोडताना खास पोस्ट चर्चेत

"बोलण्यासारखं खुप आहे पण..."; 'बाळूमामा' साकारणाऱ्या सुमित पुसावळेची मालिका सोडताना खास पोस्ट चर्चेत

कलर्स मराठीवर 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' ही मालिका चांगलीच गाजतेय. गेली ५ वर्ष ही मालिका अखंडपणे सुरु आहे. मालिकेत अभिनेता सुमित पुसावळे बाळूमामांची प्रमुख भूमिका साकारत आहे. परंतु आता सुमितने या मालिकेला रामराम ठोकलाय. मालिका सोडताना सुमितने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहीली आहे. सुमित लिहीतो, "बाळूमामाच्या नावानं चांगभलं. ..नमस्कार, मी सुमित पुसावळे, खरं तर ही ओळख “बाळुमामा” ह्या नावा व्यतिरिक्त लगेच नाही होत आणि त्याच कारण तर तुम्हाला माहिती आहेच. बोलण्यासारखं, लिहण्यासारख खुप काही आहे.."

सुमीत पुढे लिहीतो, "आजही बाळुमामाच्या नावानं चांगभलं सिरीयल च्या सेटवरचा योगायोगाने गेलो होतो तो दिवस आठवतोय, योगायोगाने आणि पुढच्या काही दिवसातच बाळूमामांच्या रोल साठी बोलावण आल आणि माझ्या आयुष्यात नवीन पर्व सुरु झालं. बाळूमामांच्या सेवेत रुजू झालो.सगळ्यातआधी ह्या मालिकेचे निर्माते श्री. संतोष अयाचित सर  यांचे मनापासून आभार. मला, सुमित पुसावळेला एक वेगळी ओळख दिली, ही ओळख आयुष्यभरासाठी राहील अस काम माझ्याकडून करून घेतलंत. निखिल साने सर, दीपक राजध्यक्ष सर, विराज राजे सर, केदार शिंदे सर. मालिकेचे दिग्दर्शक केदार सर. सगळ्यांनी  मला प्रोत्साहन दिलं."

सुमित शेवटी लिहीतो, "माझ्या सोबतचे हजारो कलाकार तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मायबाप प्रेक्षकांनो तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल खुप खुप आभार. आजवर मला बाळुमामा म्हणून खुप प्रेम दिलत, खुप साथ दिलीत, मला त्या रोल मध्ये स्वीकारल, माझ्यावर विश्वास ठेवलात अशीच साथ तुम्ही यापुढे ही द्या, असाच विश्वास माझ्यावर ठेवा, आणि असच प्रेम माझ्यावर अन माझ्या कामावर करा. लवकरच भेटूयात . जाता जाता एवढंच म्हणेन बोला बोला बाळूमामामाच्या नावानं चांगभलं." सुमीतला प्रेक्षक बाळूमामाच्या भूमिकेत नक्कीच मिस करतील यात शंका नाही.

Web Title: sumeet pusavale emotional post about balumamachya navan changbhala serial