सुखविंदर सिंगला या अभिनेत्रीवर होते क्रश, द कपिल शर्मा शोमध्ये दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 18:50 IST2019-07-08T18:49:33+5:302019-07-08T18:50:45+5:30

सुखविंदर सिंगने या कार्यक्रमात कपिल शर्मा आणि त्याच्या टीमसोबत खूप धमाल मस्ती केली. तसेच या टीमसोबत त्यांच्या आयुष्यातील अनेक सिक्रेट देखील शेअर केले. 

Sukhwinder Singh had crush on Archana puran singh revealed on the kapil sharma show | सुखविंदर सिंगला या अभिनेत्रीवर होते क्रश, द कपिल शर्मा शोमध्ये दिली कबुली

सुखविंदर सिंगला या अभिनेत्रीवर होते क्रश, द कपिल शर्मा शोमध्ये दिली कबुली

ठळक मुद्देसुखविंदरला दुसऱ्या कोणी अभिनेत्रीवर नव्हे तर अर्चना पुरण सिंगवर क्रश होता. त्यानेच ही गोष्ट या कार्यक्रमात अर्चनाच्या उपस्थितीत सांगितली.  

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात या कार्यक्रमात गायक सुखविंदर सिंग, मिथुन आणि जुबीन नौटियाल आले होते. तसेच निर्माते शैलेंद्र सिग यांनी देखील या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. त्यांनी या कार्यक्रमात वन इंडिया, माय इंडिया या गाण्याचे प्रमोशन केले. त्यांनी या कार्यक्रमात कपिल शर्मा आणि त्याच्या टीमसोबत खूप धमाल मस्ती केली. तसेच या टीमसोबत त्यांच्या आयुष्यातील अनेक सिक्रेट देखील शेअर केले. 

सुखविंदर सिंगने चल छैय्या छैय्या, उडी उडी जाएं, गल्लन गुडियाँ, लगन लगी, कर हर मैदान फतेह, जय हो यांसारखी अनेक हिट गाणी गायली आहेत. त्याच्या गायनाचे अनेक फॅन असून बॉलिवूडमधील आघाडीच्या गायकांमध्ये आज त्याची गणना केली जाते. त्याने द कपिल शर्मा शो मध्ये साडा चिडियाँ दा चम्बा हे गाणे गायले. हे गाणे ऐकून अर्चना पुरणसिंग चांगलीच भावुक झाली होती. मुलीचे लग्न झाल्यानंतर आपले माहेर सोडताना एका मुलीची अवस्था काय असते हे या गाण्याद्वारे मांडण्यात आले आहे. हे गाणे ऐकून केवळ अर्चनाच नव्हे तर उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आले होते. या गाण्यानंतर अर्चना यांनी सुखविंदर यांचे तोंडभरून कौतुक केले.

सुखविंदर सिंगने द कपिल शर्मा शोमध्ये कपिल आणि त्याच्या टीमसोबत गप्पा मारताना काही सिक्रेट देखील सांगितले. सुखविंदरला एका अभिनेत्रीवर क्रश होता असे देखील त्याने या कार्यक्रमात कबूल केले. पण ही अभिनेत्री कोण होती हे कळल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण सुखविंदरला दुसऱ्या कोणी अभिनेत्रीवर नव्हे तर अर्चना पुरण सिंगवर क्रश होता. त्यानेच ही गोष्ट या कार्यक्रमात अर्चनाच्या उपस्थितीत सांगितली.  

Web Title: Sukhwinder Singh had crush on Archana puran singh revealed on the kapil sharma show