'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील गौरीचा साडीतील अदा पाहून जयदीपचं काय तुम्हीही पडाल प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 19:32 IST2022-04-01T17:55:41+5:302022-04-01T19:32:20+5:30
सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) मालिकेतील गौरी प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील गौरीचा साडीतील अदा पाहून जयदीपचं काय तुम्हीही पडाल प्रेमात
स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील गौरी तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गौरी उर्फ गिरिजा प्रभु ही घराघरात पोहोचली.
गिरीजा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपले फोटो आणि व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असते. गिरीजाने तिचे साडीतले फोटो इन्स्टावर पोस्ट केलंत. फोटोत तिने घातलेल्या नथीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. गिरीजाने अतिशय वेगळ्या स्टाईलची नथ घातली आहे. मराठी परंपरेचे प्रतीक - आपली मराठमोळी नथ! असं कॅप्शन तिने या नथीसोबत दिलं आहे. गिरीजाचे चाहते खूप सुंदर, नादखुळा अशा कमेंट्स तिच्या या फोटोवर करतायेत.
तरीदेखील तिने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेआधी अनेक चित्रपट आणि मालिकांमधून तिनं काम केलं आहे. गिरिजाचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दोन्ही पुण्यात झालं. गिरिजाला लहानपणापासूनच अॅक्टिंग आणि डान्सची आवड होती. गिरिजाच्या कुटुंबातून कुणीच या क्षेत्रात नाही. मात्र गिरिजाने डान्स क्लास जॉईन केला. शिवाय उन्हाळी, सुट्टीमध्ये एका शिबिरात सहभाग घेतला. तेव्हा तिने एक नाटक केलेलं. त्या मधून तिचा अॅक्टिंग मध्ये इंटरेस्ट वाढला मग डबिंगचा गिरिजाने कोर्स केला आणि मग त्यानंतर तिने हळूहळू आॅडिशन द्यायला सुरुवात केली.
कौल मनाचा, काय झालं कळंना , सेंट मेरी मराठी मिडीयम, डॅड चिअर्स , तुझा दुरावा हे तिचे काही गाजलेले चित्रपट. याबरोबरच तिने मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका आणि एक शॉर्ट फिल्म सुद्धा केली आहे.